लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त
राज्यभर उत्साहाचं वातावरण आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेऊन
शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरही
शिवजयंतीच्या निमित्तानं सजावट करण्यात आली आहे. मात्र, तिथं करण्यात आलेल्या विचित्र प्रकारच्या
रोषणाईवरून वाद निर्माण झाला आहे. शिवाजी महाराजांचे वंशज, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी या
संदर्भात नाराजी व्यक्त केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यावर “शिवकालीन वास्तुंच पावित्र्य राखल गेल पाहिजे” अशी प्रतिक्रिया
दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या
युगपुरुषाच्या जयंतीनिमित्त एक वेगळा उत्साह लोकांमध्ये असतो. या उत्साहाच्या भरात
काही लोक नको त्या गोष्टी करत असतात. अजाणतेपणे अशा गोष्टी होतात. मात्र, हे थांबलं पाहिजे,' असं अजित पवार
म्हणाले. उत्सव साजरा करताना संबंधित महापुरुषांचे विचार व कार्य लक्षात घेतले
गेले पाहिजे. शिवजयंतीच्या निमित्तानं गडकिल्ल्यांवर मोठ्या संख्येनं तरुण जात
असतात. इतकंच काय, नवी पिढी १२ महिने तिथं जात असते.
त्यांच्यापुढं योग्य गोष्टी आल्या पाहिजेत. आज घडलेली बाब गंभीर आहे. पुन्हा अशा
घटना घडू नयेत म्हणून प्रशासनाला काळजी घ्यावी लागेल,' असं अजित पवार म्हणाले.
संभाजीराजे यांनी ट्वीट करून रायगडावरील
रोषणाईला आक्षेप घेतला होता. “रायगड किल्ल्यावर करण्यात आलेली
प्रकाशयोजना अतिशय विचित्र स्वरुपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे.” भारतीय
पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल. पुरातत्व
खात्याचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील कसे? रंगबिरंगी प्रकाशयोजना केल्यामुळं हे पवित्र
स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो आहे,' अशा तीव्र भावना संभाजीराजे यांनी व्यक्त
केल्या होत्या.
0 टिप्पण्या