Ticker

6/Breaking/ticker-posts

श्रीगोद्याचे ज्येष्ठ नेते सदाअण्णा पाचपुते यांचे निधन

  


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर : - माजीमंत्री व श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांचे बंधू सदाशिव उर्फ सदाअण्णा पाचपुते  (वय ६७ वर्षे ) यांचे आज दुपारी २.४० वा.पुणे येथे  निधन झाले आहे.   अंत्यविधी सायंकाळी ७ वा काष्टी येथे घोडनदी तिरी होणार आहे .

राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असून राजकीय क्षेत्रातील लोकही कोरोनाचे शिकार होत आहेत. जिल्हा परिषद सदस्य, भाजपचे गटनेते सदाशिव पाचपुते यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. पुणे येथे रुबी हॉलमध्ये त्यांच्यावर  उपचार सुरु असतांना आज दुपारी ह्वदय विकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली .

आयुष्यात एकदाही निवडणूक लढवणार नाही असे म्हणणारे पाचपुते यांनी यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने विजयी झाले होते. त्यानंतर जिल्हापरिषदेत भाजप गटनेतेपदी त्यांची निवड झाली होती.

साईकृपा शुगर प्रायव्हेट लिमिटेड ढवळगावचे अध्यक्ष होते .काष्टी येथील कृष्णाई डेअरीचे अध्यक्ष म्हणून ही त्यांनी काम पाहिले . साईकृपा उद्योग समूहाचे ते सर्वेसर्वा होते . श्रीगोंद्याच्या राजकारणात ते कायमच किंगमेकरच्या भूमिकेत वावरले . आ . बबनराव पाचपुते यांनी लढविलेल्या सर्व निवडणूकांचे ते सुत्रधार असत . किंबहुना दादांच्या राजकीय यशाचे ते शिल्यकार होते. बुलंद तोफ म्हणूनच तालुक्यात त्यांचा लैकिक होता . अत्यंत स्पष्टवक्ते . कार्यकर्त्यांची अचूक नाडी ओळखणारे अन् इत्यंभूत राजकीय माहिती असणारे एक निष्णात राजनितीज्ज्ञ असं ग्रामीण शैलीचं त्यांचं व्यक्तमत्व होत . त्यांच्या निधनाने पाचपुते कुटूंबाचा आधारस्तंभ हरपला असून तालुका एका धुरंधर राजकीय नेतृत्वाला मुकला आहे . भावपूर्ण श्रद्धांजली ..!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या