Ticker

6/Breaking/ticker-posts

छ . शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला एकत्र करुन रयतेचे राज्य निर्माण केले - आ. संग्राम जगताप

 
लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )


अ.नगर : - छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समाजाला एकत्र करुन रयतेचे राज्य निर्माण केले. आजच्या युवापिढीला महाराजांच्या चरित्राची ओळख निर्माण व्हावी यासाठी विविध सामाजिक संस्थांनी व युवक मंडळांनी पुढे येऊन त्यांचा इतिहास समाजापुढे  मांडावा .समाजासाठी आयुष्यभर संघर्ष करून .रयतेला सुखी ठेवण्याचे काम केले.   असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

आ.जगताप पुढे बोलतांना म्हणाले .गेल्या १ वर्षापासून कोरोना संसर्ग विषाणूमुळे समाजामध्ये एक भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर मात करण्यासाठी समाजाने शासन नियमांचे वेळोवेळी नियमित पालन करणे गरजेचे आहे. संपूर्ण शहरामध्ये छत्रपतींची जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन उत्साहात साजरी केली. मुस्लिम समाजाने शहरामध्ये विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 

पै.अफजल शेख मित्र मंडळाच्या वतीने बस स्थानक येथे शिवजयंती उत्साहात साजरी. शिवजयंतीनिमित्त बस स्थानक येथे इम्पिरियल चौक चौकात अफजल भाई मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शहराचे आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पै. गणेश साळवे, अजहर शेख, शोएब बिल्डर, मोहसीन शेख, फरहान शेख, विशाल खताळ, कुणाल हरबा, निखिल शिंदे, सागर शिंदे, विकी पाटोळे, मयुर भापकर, शुभम भापकर, श्रीकांत आंबेकर, अक्षय सांगळे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या