Ticker

6/Breaking/ticker-posts

कर्जत तालुक्यातील 'या' गावाना २ वर्षांपासून कुकडीचे पाणी नाही..

 

लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

कर्जत:-कर्जत तालुक्यातील खातगांव, लोणी मसदपुर, आंबिजळगांव या तीन गावातील शेतीसाठी गेल्या दोन वर्षांपासून कुकडीचे पाणी मिळाले नाही, यामुळे पिके जळू लागली आहेत. सध्या कुकडीचे आवर्तन सुरू आहे यामधून पाणी सोडा अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार नानासाहेब आगळेे यांना निवेदन देऊन केली आहे

.या निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे की गेल्या  दोन वर्षांपासून आमच्या भागाला कुकडीचे पाणी मिळाले नाही, कुकडीचे पाणी मिळावे यासाठी मागणी अर्ज व पाणी पट्टी भरली आहे. गेल्या वर्षी पाणी न मिळाल्याने उभी पिके जळाली तर यावर्षी पहिले आवर्तन सोडले नाही, दुसरे आवर्तन सोडण्यासाठी उशीर झाला यामुळे आज आमची पिके जळू लागली आहेत. ज्वारीच्या पिकांना पाणी मिळाले नाही यामुळे काही पिके जळाली सध्या कर्जत तालुक्यात कुकडीचे आवर्तन सुरू आहे. करमाळा तालुक्यातील, वीट व मांगी कुंभेज या भागात कुकडीचे पाणी पोहोचले पण कर्जत तालुक्यातील खातगांव, लोणी मसदपुर, आंबिजळगांव या भागात पोहोचले नाही तरी चालू आवर्तना मधून पिकांसाठी पाणी मिळावे आता जर पाणी आले तर  बंधारे भरुन घ्यावेत जेणे करून उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, यामुळे आताच कुकडीचे पाणी द्या अशी  मागणी तीन गावातील शेतकऱ्यांनी केली.

 
यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळेे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देताना सांगितले की - तुमची ही मागणी जिल्हाधिकारी व कुकडीचे अधिकारी यांना कळवितो तुम्हाला कुकडीचे पाणी मिळावे यासाठी पाठपुरावा करु असे सांगितले. या मागणीचे निवेदन प्रांत अधिकारी, तहसीलदार , उपविभागीय पोलीस अधिकारी, उप अभियंता कुकडी विभाग यांना देण्यात आली आहेत. शेतकऱ्यांच्या या शिष्टमंडळात प्रहारचे महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विमलताई अनारसे बिभीषण अनारसे, विजय कटारे, किरण चव्हाण, मनोज होले, नवनाथ फणसे, बाळासाहेब वाघ, चंद्रकांत आटोळे, उद्धव ठाणगे, कचरु बनसोडे, नवनाथ आटोळे, किसन रणशिंग यांचे सह अनेक शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या