Ticker

6/Breaking/ticker-posts

नेवासा : ग्रामदैवत मोहिनीराजांची यात्रा यावर्षी नाही.

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

नेवासा :- महाराष्ट्रसह जगातील अनेक कुटुंबांचे कुलदैवत असलेल्या नेवाशाचे ग्रामदैवत मोहिनीराजांची यात्रा यावर्षी  कोरोनामुळे होणार नसल्याचे पंच कमिटी व पुजारी बडवे कुटुंबीयांनी जाहीर केले आहे . नेवासा शहराचे ग्रामदैवत विष्णूच्या मोहिनी अवताराचे जगातील एकमेव अर्धनारीनटेश्वर मोहिनीराजाचे मंदिर आहे महाराष्ट्रातच नव्हेतर जगभरात अनेक ब्राह्मण कुटुंबांचे हे कुलदैवत असल्याने यात्रेच्या पंधरा दिवसात अनेक जण देवाला नवस फेडणे अथवा दर्शनासाठी येत असतात. रथसप्तमीच्या दुसऱ्या दिनांक 20 फेब्रुवारी पासून सुरू होणारी ही यात्रा जाहीर भागवत कथा कीर्तन, पालखी सोहळा ,काला ,यासह पाच दिवसांचे गाव जेवण  पंगती यासाठी प्रसिद्ध आहे ४ मार्च रोजी या यात्रेची सांगता होणार होती.

 

          या दरम्यान लाखो भाविक नेवासात येत असतात मात्र कोरोना च्या पार्श्वभूमीवर सदरच्या देवस्थानचे पंच कमिटी व पुजारी बडवे यांनी यावर्षी यात्रा भरणार नसल्याचे जाहीर केले आहे रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवशी २० फेब्रुवारी पासून मंदिरांमध्ये भागवत  संस्कृत संहिता वाचली जाणार असून  यावेळी मंदिरात समयांचा दीपोत्सव सात दिवस होईल. त्यानंतर पाच दिवस मोहिनीराज महाराजांची उत्सव मूर्ती पाच दिवसासाठी पाक शाळेत जाण्याऐवजी मंदिरातच गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी ठेवली जाणार आहे व पाच दिवसांनी पुन्हा एकदा विधीवत  पूजा होऊन देव मूर्ती मूळ जागी विराजमान होणार आहे. 

 

       यावर्षी पालखी सोहळा काला ,पंगती ,यात्रा, जाहीर भागवत कथा ,कुस्ती हंगामा,किर्तन, तसेच  मंदिरा वर नवसाच्या झेंडा लावण्यासाठी असलेल्या झेंडा मिरवणुका रद्द करण्यात आले आहेत तरी भाविकांनी याविषयी नोंद घ्यावी असे पंच कमिटीने जाहीर केले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या