Ticker

6/Breaking/ticker-posts

मिथुन डोगंरे तळमळीचा कार्यकर्ता- प्राचार्य सुनील पंडित

 

जिल्हा मुख्याध्यापक सघांच्या वतीने सत्कार

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

 

खरवंडी कासार : - मिथुन डोंगरे हे तळमळीचा कार्यकर्ता असुन त्यानी अत्यंत तळमळीने शिक्षण क्षेत्रातील तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संस्था काढून पाथर्डी तालुक्यासार्ख्या ग्रामीण भागामध्ये गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचे कार्य केले,असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचेअध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित यानी केले.  

 

    पंडित म्हणाले की,  त्यामुळेच पाथर्डी तालुक्यामधून अहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डोंगरे हे आपल्या गावातील खरवंडी कासार ग्रामपंचायत मध्ये प्रचंड मताधिक्क्याने निवडून आले. यांची ग्रामपंचायत खरवंडी कासार, तालुका पाथर्डी , जिल्हा अहमदनगर या ग्रामपंचायतीवर  सदस्य म्हणुन पाथर्डी तालुक्यातून विक्रमी मताधिक्‍याने निवडून आल्याबद्दल अहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष सुनील पंडित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला


       यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कोषाध्यक्ष बाळासाहेब वाकचौरे व जुन्या पेन्शन योजनेचे विभाग संयोजक प्राचार्य श्री चंद्रकांत चौगुले , पाथर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढाकणे , अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ अहमदनगर चे जिल्हा उपाध्यक्ष श्री शिवाजी ढाकणे आदी उपस्थित होते. यावेळी श्री डोंगरे यांना सर्वांच्या वतीने आगामी  होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये निश्चित यश मिळेल अशा सर्वांनी शुभेच्छा दिल्या

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या