Ticker

6/Breaking/ticker-posts

जेऊरला कारच्या धडकेत नेवाशाचा दुचाकीस्वार जागीच ठार

                                                                                        

   
लोकनेता न्यूज 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर-औरंगाबाद महामार्गावर जेऊर शिवारात मंगळवार २ फेब्रुवारी रोजी झालेल्या कार व दुचाकीच्या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे.
    याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर शिवारात लिगाडेवस्ती नजीक औरंगाबाद कडून नगरकडे जाणाऱ्या सियाज कारने(क्र. एम.एच १४ जी.ए.७७०५) नगरकडेच जाणाऱ्या बजाज डिस्कव्हर (क्र. एम.एच. १६ ए.यु.१९७४) दुचाकीला पाठीमागुन जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार पांडुरंग भानुदास कराळे (वय ५० रा. घोडेगाव ता.नेवासा) हा जागीच ठार झाला आहे. कार भरधाव वेगात असल्याने अपघातानंतर गाडीने दोन पलट्या खाल्ल्या. दोन्ही वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
     अपघातग्रस्तांना अक्षय तोडमल, सोमनाथ तोडमल, मयुर तोडमल, सचिन वरखड, युवराज तोडमल, संभाजी तोडमल, भाऊसाहेब तोडमल यांनी मदत केली. एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे हवालदार रमेश थोरवे, पोलीस नाईक गणेश कावरे, महम्मद शेख, संदिप आव्हाड, दिपक गांगर्डे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली.
    लिगाडे वस्तीजवळ इमामपुर शिवरस्त्याचा चौक असल्याने येथे वारंवार लहान-मोठे अपघात घडत असतात. तरी या परिसरात गतिरोधक बसविण्याची मागणी भिमराज तोडमल, नारायणदादा तोडमल, जगन्नाथ तोडमल, बाळु शेटे, नंदु तोडमल यांच्यासह ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या