Ticker

6/Breaking/ticker-posts

इटन कंपनीत पगारवाढ करार : कामागारांमध्ये नवचैतन्य- संपत बारस्कर

लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

 अहमनगर: एमआयडीसीमधील औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या कराराचा इतिहासात नोंद होईल असा करार अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेच्या माध्यमातून इटन कंपनीमध्ये संपन्न झाला. कामगारांना कामगार कायद्याप्रमाणे न्याय मिळावा, यासाठी संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे व संघटनेचे पदाधिकारी यांनी कंपनीबरोबर सुमारे ६५ मिटींग घेऊन कामगार व प्रशासन यांच्यामध्ये समझोता निर्माण करुन कामगारांना न्याय मिळवून दिला आणि करारामध्ये कायमस्वरुपी कामगागारांना भरघोस अशी १६७५८ रुपयांची पगारवाढ झाली असल्यामुळे कामगारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. आम्ही सर्व युवक आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक बांधिलकीतून विविध प्रश्न मार्गीलावत असल्याचे प्रतिपादन मनपा विरोधीपक्ष नेते संपत बारस्कर यांनी केले.

अहमदनगर जिल्हा कामगारा संघटनेच्या प्रयत्नातून एमआयडीसीतील इटन कंपनीतील कायमस्वरूपी कामगारांचा १६७५८ रुपयांची पगारवाढ करुन करारनामा संपन्न झाला. यावेळी मनपा विरोधीपक्ष नेते संपत बारस्कर, संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, कंपनीचे वरद राजन बालचंद्रन, प्रसन्ना आपटे, भुपेंद्र सिंग, राजेश पेवाल, कामगार प्रतिनिधी वैभव पादीर, महेश चेडे, गौतम मेटे,वैभव तोडमल, कासिम शेख, श्रीकृष्ण थोरात, हरिकृष्ण ढेरे,  बोरुडे, कंपनीचे वरद राजन बालचंद्रन, प्रसन्ना आपटे, भुपेंद्र सिंग, राजेश पेवाल, कामगार प्रतिनिधी वैभव पादीर, संघटनेचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होतेसंघटनेचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.

संघटनेचे अध्यक्ष संतोष लांड पुढे म्हणाले की, आ. संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांचा हक्क मिळवून देण्यासाठी कंपनीशी वारंवार पत्रव्यवहार, पाठपुरावा करुन मिटींग घेऊन चर्चा करण्यात आली व योग्य मार्ग काढून कामगारांना मेडिकल इन्शुरन्समध्ये वाढ करून २ लाखावरून ३ लाख करण्यात आला. तसेच दिवाळी बोनस २५ हजार करण्यात आला. याचबरोबर २0१८-१९ मधील वाढीव बोनस म्हणून प्रत्येक कामगारांस १ हजार रुपये मिळवून देण्यात आला. तसेच कामगारांना २७ सुट्॒यांवरुन ३५ सुट्ट्या करण्यात आल्या.  
कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यावर १0 लाखावरून १५ लाख रुपये करण्यात आला व संघटनेच्या सर्व सभासदांचा एक दिवसाचा पगार मृत कामगारांच्या कुटुंबांना त्याच महिन्यात देण्यात येईल. याचबरोबर क्रीडांगण, वाचनालय, मेडिकल रुम, कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाबरोबरच आरोग्याच्या विविध योजना राबविण्यात येणार आहे व इतर अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या

. या व्यतिरिक्त एकरकमी प्रत्येक कामगारास १२ हजार रुपये ३ महिन्याच्या टप्प्याने देण्यात आले. तसेच संपूर्ण देशावर आलेल्या कोरोना संकटाच्या काळामध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते. सर्व औद्योगिक क्षेत्र ठप्प होऊन उद्योग बंद होते. कामगार तीन महिने घरी असूनही कंपनीकडून तीन महिन्याच्या पगाराबरोबर फरकही मिळवून दिला आहे. कोरोना काळामध्ये कंपनी व्यवस्थापनाने मोलाचे सहकार्य केले आहे. कामगार व उद्योजक हे एकमेकांवर अवलंबून असतात. दोघांमधील चर्चेने विषय सोडविण्याचे काम संघटना करत असते. संघटना ही एक दुवा आहे. यापुढील काळातही कामगार व प्रशासनाने बरोबर राहून कंपनीच्या व कामगाराच्या प्रगतीमध्ये भर पडण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाईल, असे ते म्हणाले.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या