Ticker

6/Breaking/ticker-posts

राळेभात बंधू राजकारण- समाजकारणात सक्रीय !








लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

साकत : -राज्यात अग्रेसर असलेल्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक सध्या सुरू आहे या निवडणुकीत जामखेड  तालुक्यातून बिनविरोध विजयी झालेले अमोल राळेभात  व त्यांचे बंधु सुधीरदादा राळेभात यांनी  साकत ,कडबनवाडी  भागातील शेतकऱ्यांच्या  बांधावर  जाऊन त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडविण्याचे आश्वासन दिले .  


     सन 1997 पासून  2021 पर्यंत च्या काळात  पाच वर्षाचा काळ सोडला तर अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर जामखेड तालुक्यातून जगन्नाथ तात्या राळेभात बिनविरोध निवडून येत आहेत  यंदाही जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत जामखेड तालुक्यातून जगन्नाथ राळेभात यांचे  यांचे पुत्र अमोल राळेभात हे बिनविरोध विजयी झाले आहेत जवळपास  ४८ सेवा सहकारी संस्था असलेल्या तालुक्यात बोटावर मोजण्या येवढया सोडता  सर्व सेवा सहकारी संस्था राळेभात यांच्या ताब्यात आहेत. सर्व सहकारी संस्थावर  यांचे निर्विवाद वर्चस्व आहे त्याचाच परिणाम म्हणून सहकार क्षेत्रात यांच्या विरोधात कुणी लढण्याचे धाडस करत  नाहीत.


  तालुक्यातील सर्व सेवा सहकारी संस्था व  शेतकरी यांना  जिल्हा बँकेकडून वेळोवेळी मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा करण्यात  राळेभात यांची महत्त्वाची भूमिका  असते  त्याचाच परिणाम म्हणून तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समिती यासह सर्व सहकारी संस्थांमधील संबंधितांचे  राळेभात कुटुंबाशी चांगले संबंध आहेत हे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी राळेभात कुटुंबातील  जगन्नाथ तात्या राळेभात ,सुधीर राळेभात व अमोल राळेभात  हे सर्वजण कामात व्यस्त असतात सध्या अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँकेची निवडणुकीचा कार्यक्रम सुरू असून यामध्ये अनेक संचालक बिनविरोध विजयी झाले आहेत  त्यातील अमोल राळेभात हे जामखेड तालुक्यातून बिनविरोध विजयी  झाले आहेत   


   मतदान मागण्यासाठी अनेक पुढारी शेतकऱ्यांच्या शेतात येतात मात्र बिनविरोध निवड झाल्यानंतर आमच्या बांधावर येऊन चौकशी करणारे राळेभात बंधुचे  करावे तेवढे कौतुक कमी आहे. आम्ही जो विश्वास टाकला तो सार्थकी  लागल्याचे मा मत  रामहारी नेमाने यांनी व्यक्त केले .

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या