Ticker

6/Breaking/ticker-posts

संघर्षातून समृध्दी निर्माण करणारे नेते ; ना. बाळासाहेब थोरात


लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

शांत,संयमी,अभ्यासू परंतु आपल्या विचारांशी ठाम असणारे बाळासाहेब थोरात यांचे राजकारण नेहमीच बेरजेचे आणि विकासाचे राहिले आहे,35 वर्ष्याच्या आमदारकीच्या काळात,15 वर्षाच्या मंत्रीपदाच्या कालखंडात त्यांच्यावर कोणताच ठपका नाही की, आरोप नाही.सतत 24 तास लोकांना उपलब्ध असलेल्या या नेत्याला भेटण्यासाठी कोणाही मध्यस्थाची गरज नसते,यांचे दार लोकांसाठी सदैव खुले असते. विकासाचा ध्यास,पारदर्शी कारभार यांमुळे साहेबांच्या नेतृत्वाखालील सर्व सहकारी संस्था, शिक्षण संस्था , ग्रामपंचायती,पंचायत समिती, नगरपालिका रायात प्रगतीपथावर आहेत. 
     संगमनेर अकोलेच्या शेतकरी,व्यापारी, उद्योजक यांना पाणी चोर म्हणून हिणवले जाई, कारण भंडारदरा धरण ते ओझर बंधारा पर्यंत प्रवरा नदीचे पाणशेतीसाठी,पिण्यासाठी,उद्योगासाठी,व्यापारासाठी वापरायला इंग्रज कालीन पाणीवाटपानुसार मनाई होती,या अन्याय्य पाणीवाटप विरुध्द 1985 ते 1990 या काळात बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड जण आंदोलन झाले, आणि शासनाला 75 वर्षे जुने पाणीवाटप बदलणे भाग पाडून, संगमनेर अकोला तालुक्याला हक्काचे 30 % पाणी मिळवून दिले.साहेबांच्या पहिल्या आमदारकीचा काळातली हि सगळ्यात मोठी उपलब्धी होती. याच काळात त्यांनी विडी कामगार किमान वेतन समितीचे अध्यक्ष काम करतांना विडी कामगारांना महागाई भत्ता मिळवून दिला. गाव तेथे शाळा,गाव तेथे हायस्कुल ही मोहीम त्यांनी 90 ते 95 या काळात हाती घेतली,आणि तालुक्यात जवळपास 100 हायस्कुलला परवानगी मिळवून दिली, सुरुवातीला या शाळा विनाअनुदानित होत्या, त्यासाठी निधी उपलब्ध करणे आवश्यक होते,त्यासाठी गाव तेथे दूध डेयरी,दूध डेयरी तेथे पतसंस्था अशी मोहीम हाती घेतली. दूध सोसायट्यांनी या विनाअनुदानितशाळांना आर्थिक मदत करावी असा कार्यक्रम राबवला यामुळे तालुक्यात शैक्षणिक क्रांती झाली.घरा जवळ शाळा झाल्यामुळे मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले. दुधव्यावसायमुळे ग्रामीण भागात आर्थिक सुबत्ता आली,पतसंस्था आणि शाळा,विविध मेडिकल,अभियांत्रिकी,शिक्षण महाविद्यालयांमुळे खेडोपाडी मोठा रोजगार निर्माण झाला. 
     95 ते 99 हा काळ युती सरकारचा होता,अशा काळातही साहेबांनी लोकांचे प्रश्न सोडवणे आणि विकासाची घोडदौड यात सातत्य ठेवले,त्यासाठी जनआंदोलन हे प्रभावी हत्यार त्यांनी वापरले. 99 नंतर साहेब पाटबंधारे रायमंत्री झाले,याकाळात त्यांनी सारे लक्ष निळवंडे धरणावर केंद्रीत केले,धरणाच्या कामात पुनर्वसन हा मुख्य अडथळा होता,त्यासाठी स्वत:ची पाच एकर बागायत जमीन प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन म्हणून दिली.आधी पुनर्वसन मग धरण हे सूत्र अंमलात आणले.धरणाच्या कामातील सर्व अडथळे दूर करून प्रत्यक्ष भिंतीच्या कामाला सुरुवात केली.रायमंत्री म्हणून निरनिराळ्याा खात्यांची कामे या कौशल्याने केली त्यामुळे रायाचे नेतृत्व प्रभावित झाले आणि त्यांना 2004 ते 2014 या कालखंडात राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून कायम संधी मिळाली. कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी कृषी खात्याच्या कारभारात मूलगामी बदल केला,कृषी विद्यापीठे लोकाभिमुख केली,शेतकरी आणि कृषी विद्यापीठे यांचा सातत्यपूर्ण संवाद घडवून आणला,त्यासाठी शिवारफेरी, आवश्यक तेथे संशोधन इ.निर्णय केले,रायात शेततळ्याची विक्रमी निर्मिती केली,महापीक योजना आणली 2009 ला साहेब महसूल मंत्री झाले, काँग्रेसच्या कोट्यातील ते सर्वोच्च खाते होते,यापूर्वीचे सर्व महसूल मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाने बदनाम झाले,पण साहेबांवर पाच वर्षाच्या दीर्घ काळात एकही आरोपांचा शिंतोडा उडाला नाही. 
     महसूलमंत्री म्हणून काम करतांना त्यांनी सात - बारा उतारा व महसूल कागदपत्रांचे संगणिकीकरन केले आणि महसूल विभाग ऑनलाइन केला,त्यामुळे आज कोणालाही आपला सातबारा उतारा घरबसल्या मिळतो आहे त्याचे श्रेय साहेबांचे आहे,याच काळात त्यांनी पांद रस्त्यांचाप्रश्न,जमीनमोजणी,दस्तनोंदणी यात सुलभीकरण घडवून आले. ते कुशल प्रशासक आहेत,अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य मिळवतांना विश्वासार्हता, पारदर्शकता हे साहेबांचे गुण प्रकर्षाने दिसून येतात. या संपूर्ण मंत्री पदाच्या काळात संगमनेर तालुक्याचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले.निळवंडे धरण बांधुन पुर्ण झाले,निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याची 80 % कामे पूर्ण झाली,त्यात दोन मोठे भूमिगत बोगदे खोदून तयार आहेत,संगमनेर शहराचा पिण्याच्या पाण्यासाठी निळवंडे धरण ते शहर थेट पाईप लाईन टाकून ग्रॅव्हीटीने पाणी आणून पाण्याचा प्रश्न सोडवला, मोठमोठ्या प्रशासकीय इमारती,प्रवरेवरचे तीन ते चार पूल,बायपास, नासीक पुणे महामार्गाचे विस्तारीकरण यामुळे तालुक्याचे चित्र बदलले आहे.
     2014 नंतर देश व राज्यात सत्तांतर झाले,या काळात भले भले लोक स्वार्थासाठी काँग्रेस सोडून पळाले,पण साहेब मात्र भक्कमपणे काँग्रेस बरोबर राहिले,त्यामुळे त्यांच्या या निष्ठेचा काँग्रेस पक्षाने सन्मान केला,त्यांना काँग्रेस वर्किंग कमिटीचे कायम निमंत्रीत सदस्य केले आणि आता काँग्रेसचे प्रदेक्षाध्यक्ष पद देऊन त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे, या पदाला बाळासाहेब थोरात निश्चितच न्याय दिला, राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाला एकत्र करुन महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग केला. जनसामान्यांच्या मनातील सरकार सत्तेवर आले.आणि नामदार थोरात महसूलमंत्री झाले. कोरोना संकटाने 2020 ठप्प केले मात्र नामदार थोरातांनी या काळात 18 - 18 तास काम करुन केलेले नेतृत्व हे प्रत्येकासाठी अभिमानास्पद ठरले अशा संघर्ष करणार्या नेतृत्वाला वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा - हिरालाल पगडाल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या