( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नगर:- नुकत्याच पार पडलेल्या ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणूकीनंतर या ग्रामपंचातीच्या सरपंच , उपसरपंच पदाच्या निवडी दि .९ रोजी पार पडल्या . यामध्ये अनेक ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले . तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या कारभार्यांना आपआपल्या गावची सत्ता राखण्यात यश आले. मात्र, बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांच्या हातातून यंदा गावची सत्ता निसटली आहे. सरपंचपदी मंगल सकट तर उपसरपंचपदी अपक्ष निवडून आलेले संतोष भापकर विजयी झाले. चिचोंडी पाटीलमध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांची सरपंच पदी निवडून आले. निंबळकमध्ये पुन्हा लामखडे यांचे वर्चस्व सिद्ध झाले. सरपंचपदी प्रियंका लामखडे तर उपसरपंचपदी बाळासाहेब कोतकर यांची बिनविरोध निवड झाली.
नगर तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जिल्हापरिषदेच्या कारभार्यांना व तालुक्यातील नेत्यांना आपापल्या गावांची सत्ता राखण्यात यश आले. मात्र काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपत म्हस्के (टाकळी काझी ) व पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर ( भोरवाडी ) यांना निवडणुकीत धक्का बसला. गुंडेगावमध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुकीत बाळासाहेब हराळ यांच्या गटाला सहा तर विरोधी गटाचे सहा व एक अपक्ष उमेदवार निवडून आला होता. सरपंचपद आरक्षित झाल्याने आणि तो उमेदवार विरोधकांकडून असल्यामुळे मंगल संतोष सकट यांची सरपंचपदी तर अपक्ष उमेदवार संतोष भापकर यांची उपसरपंचपदी निवड झाली. नवनागापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी डॉ. बबनराव डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली. जेऊरमध्ये राजश्री मगर सरपंच झाल्या. खारे कर्जुनेत प्रभाकर मगर सरपंच तर अंकूश शेळके उपसरपंच पदी बिनविरोध झाले. वाळूंजमध्ये सरपंचपदी सुखदेव दरेकर तर उपसरपंचपदी अनिल मोरे यांची निवड झाली. गुणवडीत सरपंचपदी रंजना शाम साळवे व उपसरपंचपदी रावसाहेब शेळके यांची निवड झाली.
पिंपळगाव माळवीमध्ये सरपंचपदी राधीका संजय प्रभुणे तर भारती सतिष बनकर यांची उपसरपंचपदी निवड झाली . हातवळण मध्ये सरपंचपदी बाळासाहेब रंगनाथ मेटे तर उपसरपंचपदी लताबाई बापूसाहेब लोळगे यांची निवड झाली . दशमीगव्हाणमध्ये सरपंचपदी संगिता उद्धव कांंबळे तर उपसरपंचपदी बाबासाहेब काळे यांची बिनविरोध निवड झाली. खडकीमध्ये सरपंचपदी प्रविण कोठुळे व उपसरपंचपदी सुरेखा गायकवाड निवडून आले. इमापूरमध्ये सरपंचपदी भीमराज मोकाटे तर उपरसरपंचपदी लक्ष्मी वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली. दरेवाडीच्या सरपंच पदी स्वाती बेरड तर उपसरपंचपदी अनिल करांडे यांची निवड झाली. जेऊरमध्ये राजश्री मगर यांची सरपंचपदी तर श्रीतेष पवार यांची उपसरपंच पदी निवड झाली. ससेवाडीमध्ये सरपंचपदी दत्तात्रय जरे तर उपसरपंचपदी प्रशांत ससे यांची बिनविरोध निवड झाली. डोंगरगणला सरपंचपदी वैशाली मते, उपसरपंचपदी संतोष पटारे यांची निवड झाली. बहिरवाडीला सरपंचपदी अंजना येवले, उपसरपंचपदी मधुकर पाटोळे यांची निवड झाली. खोसपुरीत सरपंचपदी नशीबाबी मुबारक पठाण उपसरपंच मीना भालेराव निवडून आल्या.
पिंपळगाव माळवीत सरपंचपदी राधिका संजय प्रभुणे यांची निवड झाली. इसळकच्या सरपंचपदी छाया संजय गेरंगे उपसरपंचपदी शोभा खामकर यांची निवड झाली. चिचोंडी पाटीलमध्ये सरपंचपदी मनोज कोकाटे तर उपसरपंचपदी कल्पना ठोंबरे हे विजयी झाले. पोखर्डीत सरपंचपदी रामेश्वर निमसे तर उपसरपंचपदी अजय कराळे, खंडाळ्यात सरपंचपदी मोहन सुपेकर उपसरपंचपदी दिपाली लोटके यांची निवड झाली. टाकळी काझी मध्ये प्रा . शहाजी आटोळे यांची सरपंचपदी तर अविनाश पवार यांची उपसरपंचपदी निवड झाली . तांदळी वडगावमध्ये बाळासाहेब कुंडलिक ठोंबरे सरपंच तर उपसरपंचपदी समाबाई रामदास मुनफन यांची निवड झाली . रुई छत्तीशीमध्ये सरपंचपद अनुसुचित जाती महिलासाठी राखीव होते . मात्र येथे उमेदवारच नसल्याने फक्त उपसरपंचपदाची निवड करण्यात आली . उपसरपंचपदी प्राजक्त विशाल भांबरे यांची निवड झाली . वाटेफळ मध्ये सरपंचपदी बाबासाहेब पाराजी अमृते तर सचिन सुदाम साबळे यांची उपसरपंचपदी निवड झाली . घोसपुरीत किरण साळवे सरपंच तर विठ्ठल हांडोरे यांची उपसरपंच म्हणून निवड झाली . मठपिंप्रीमध्ये हौसराव नवसुपे सरपंच तर सरस्वती उकांडे यांची उपसरपंचपदी निवड झाली . मांजरसुंबामध्ये सरपंचपदी मंगल भाऊसाहेब कदम तर उपसरपंचपदी जालिंदर मच्छिद्र कदम यांची निवड झाली .आंबिल वाडीत सरपंचपदी जयश्री केशव वाबळे तर उपसरपंचपदी जयश्री नाथू शेटे यांची निवड झाली .
हिवरेबाजार उपसरपंचपदी पोपटराव पवार
आदर्श गाव हिवरेबाजारच्या सरपंचपदी विमल ठाणगे तर उपसरपंचपदी पद्मश्री पोपटराव पवार यांची बिनविरोध निवड झाली. बुर्हाणनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रावसाहेब कर्डिले यांची निवड झाली आहे. हिवरेबाजार ग्रामपंचायतीची ३० वषार्नंतर प्रथमच निवडणूक झाली होती. या निवडणुकीत पुन्हा पोपटराव पवार यांनी वर्चस्व सिध्द केले होते. दरम्यान, मंगळवारी (दि. ९) सरपंच, उपसरपंच निवडी झाल्या. यात पोपटराव पवार यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे.
उदरमल ग्रामपंचायतीत ७ पैकी ६ जागा जिंकूनही सत्ताधारी गटाला विरोधी बाकावर बसावे लागले आहे. आरक्षणाचा उमेदवार नसल्याने येथे एकमेव निवडून आलेले जोसेफ भिंगारदिवे यांना सरपंचपदाची लॉटरी लागली आहे.
धनगरवाडीत चिठ्ठी टाकून उपसरपंच
नगर तालुक्यातील धनगरवाडी येथे अनुसुचित जमाती महिलेसाठी सरपंचपद आरक्षित झाले आहे. परंतु, ग्रामपंचायतीत या प्रवर्गाचा सदस्यच नसल्याने धनगरवाडीत सरपंचपद रिक्तच राहिले. दरम्यान उपसरपंचपदासाठी मतदान झाले. उपसरपंचपदासाठी मनिषा गायके विरुद्ध अशोक विरकर अशी लढत झाली. या लढतीत दोघांनाही समान मते मिळाली. त्यामुळे उपसरपंचपदाची चिठ्ठी टाकून निवड करण्यात आली. चिठ्ठीत मनिषा गायके उपसरपंच झाल्या.
0 टिप्पण्या