Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा बँक :अखेर निवडणूकच ; अवघ्या ४ जागांवर अडखळली 'सहमती'


 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अ.नगर : - जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेतील कालचा दिवस अत्यंत नाटयमय घडामोडींचा ठरला . अर्ज माघारीची अंतिम मुदत असल्याने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , माजी मंत्री राधाकृष्ण विखे पा . यांचेसह जिल्हयातील जवळपास सर्वच नेते मडळी शहरात सकाळ पासूनच तळ ठोकून होती . अर्ज माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा शिगेला पोहचली . मात्र एक - मेकांना चितपट करण्याच्या नादात बँकेला अखेर निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आली . सहमती अवघ्या ४ जागावर अडखळली . अन् आता २० फेब्रुवारीला बँकेच्या निवडणूकीची औपचारिकता पूर्ण होणार आहे .

ज्या जागांसाठी आता मतदान होणार आहे त्यामध्ये नगर , कर्जत, पारनेर व शेती पुरक या मतदार संघांचा समावेश  आहे .बँकेसाठी जिल्हा भरात विविध मतदार संघातील एकूण २१ जागा पैकी ५ जागा काल पर्यंत बिनविरोध झाल्या होत्या . उर्वरित १६ जागांचा फैसला आज होता . पैकी दिवस भरात १२ जागा बिनविरोध झाल्या किंवा केल्या गेल्या . परंतु केवळ ४ जागा कशा काय राहिल्या असा प्रश्न सर्व सामान्य सभासदांना नक्कीच पडला असेल . तर दोन गटात एक मेकांची जिरवा - जिरवीचं  राजकारण तिथं आडवं आलं. असो आता निवडणूकीला सामोरं जाण एवढच ..

निवडणूक होणारे मतदारसंघ व रिंगणातील उमेदवार

सेवा संस्था -

१) कर्जत:- पिसाळ अंबादास शंकरराव 

*विरुद्ध* 

साळुंखे मिनाक्षी सुरेश .

 ( मतदार-७४)

२) नगर:- कर्डिले शिवाजीराव भानुदास 

*विरुद्ध* 

बेरड सत्यभामाबाई भगवानराव-

( मतदार १०९)

*३) पारनेर:-* शेळके उदय गुलाबराव 

*विरुद्ध*

 भोसले रामदास हनुमंत

 ( मतदार १०५)


*🔹बिगर शेती संस्थांचा मतदारसंघ*

४) गायकवाड प्रशांत सबाजीराव (पारनेर) 

*विरुद्ध*

 पानसरे दत्तात्रय भाऊसाहेब (श्रीगोंदा)

 ( मतदार १३७६)

*अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक-(२०२०- २०२१ ते-२०२५-२६)*


 ♦️ आज अखेर बिनविरोध निवडून आलेले संचालक*


*🔹वि. का. सेवा सहकारी संस्था मतदार संघ*

*१) अकोले:-* गायकर सिताराम कोंडाजी

*२) जामखेड:-* राळेभात अमोल जगन्नाथ

*३) कोपरगाव:-* कोल्हे विवेक बिपीन

*४) नेवासा:-* गडाख शंकरराव यशवंतराव

*५) पाथर्डी:-* राजळे मोनिका राजीव

*६) राहाता:-* म्हस्के अण्णासाहेब सारंगधर

*७) राहुरी:-* तनपुरे अरुण बाबुराव

*८) संगमनेर:-* कानवडे माधवराव सावळेराम

*९) शेवगाव:-* घुले चंद्रशेखर मारुतराव

*१०) श्रीगोंदा:-* जगताप राहुल कुंडलिकराव

*११) श्रीरामपूर:-* मुरकुटे भानुदास काशिनाथ

*🔹शेतीपूरक तसेच शेतीमाल प्रक्रिया*

*१२)  कोपरगाव:-* काळे आशुतोष अशोकराव

.

*🔹महिला प्रतिनिधी मतदार संघ*

*१३) श्रीगोंदा:-* नागवडे अनुराधा राजेंद्र

*१४) कर्जत:-* तापकीर आशा काकासाहेब


*🔹अनुसूचित जाती- जमाती मतदार संघ*

*१५) अकोले:-* भांगरे अमित अशोक


 *🔹इतर मागासवर्गीय प्रतिनिधी*

*१६) श्रीरामपूर:-* ससाणे करण जयंत


*🔹विमुक्त जाती ती व भटक्या जमाती*

*१७) संगमनेर:-* सांगळे गणपतराव पुंजाजी


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या