Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा बँक : मा. आ . मुरकुटे , अरुण तनपुरे बिनविरोध

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 


अ . नगर : अग्रगण्य अशा जिल्हा सहकारी बँकेवर श्रीरामपूर मतदार संघातून माजी आ. भानुदास मुरकुटे व राहूरीतून अरुण तनपुरे यांनी बिनविरोध निवडून येत बाजी मारली आहे .

विधानसभा असो की लोकसभा जिल्ह्यात कायम चर्चेत राहणारं बुलंद व्यक्तिमत्व म्हणून भानुदास मुरकुटेंची ओळख . भल्या भल्यांना शेवट पर्यंत ताकास तूर लागू न देण्याचं कौशल्य त्यांच्या ठायी आहे . त्यास जिल्हा बँक निवडणूकीचा तरी अपवाद कसा असेल . यावेळी ही त्यांनी शेवट पर्यंत अंदाज घेत पावलं टाकली . वाऱ्याची दिशा ओळखण्यात ते माहिर च आहेत . तशी यावेळी ही ती दिशा अचूक हेरली अन् आघाडीच्या तंबूत डेरेदाखाल होत बिनविरोध ची माळ अलगद गळ्यात पडली .
वास्तविक त्यांचा जिल्हा बँकेवर काम करण्याचा मोठा अनुभव आहे . 

अपेक्षेप्रमाणे अरुण तनपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले व तेही बिनविरोध निवडून आले . दोघाही समर्थकांनी गुलाल उधळीत आनंद व्यक्त केला .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या