Ticker

6/Breaking/ticker-posts

वाढत्या कोरोनामुळे खा . प्रितम ताईंचा वाढदिवस सोशल मीडियावर धूम करत साजरा ..








 लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

मुंबई : - बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्टात दबंग खासदार म्हणून लौकिक असलेल्या प्रितमताई मुंडे यांचा वाढ दिवस अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला . वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतः  ताईंनीच कार्यकर्ते व तमाच नागरिकांना तसे आवाहन केले होते . त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातील कार्यकर्त्यांनी फोन करून व सोशल मीडियाच्या माध्यमातून ताईंना शुभेच्छा दिल्या .


गेले दोन दिवसा पासून नेटकऱ्यांनी ताईंचे अभिनंदन करणाऱ्या पोस्ट फेसबुक व सोशल मीडियावर व्हायरल करीत त्यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव केला . पंकजाताई आणि प्रितम ताईंचा वाढदिवस हा मुंडे प्रेमींसाठी एक पर्वणी असते . बीड ,मुंबईसह ठिक ठिकाणी या दोन्ही ताईंचे वाढदिवस धुमधडाक्यात व मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात . त्यातून कार्यकत्यांमध्ये एक प्रकार चा जोष अन् उत्साह संचारतो . परंतु यावेळी कार्यकर्त्यांना आपल्या जोषाला मुरड घालावी लागली . तरीही अनेक ठिकाणी आप आपल्या पद्धतीने खा .प्रितमताईंचा वाढ दिवस साजरा केला . विशेषतः सोशल मीडियावर शुभेच्छा देण्याची धूम होती .


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खा . ताईंनी केलेले आवाहन असे :

आपणा सर्वांना ठाऊकच आहे महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे.महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थिती आता कुठे पूर्ववत होत असताना राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होऊन परिस्थिती गंभीर होत आहे.या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा करू नका अशी विनंती मी आपणा सर्वांना केली होती. त्या अनुषंगाने आपल्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी मी मुंबई किंवा बीड कार्यालयात उपलब्ध नसेल,


आपणा सर्वांच्या शुभेच्छा नेहमीच आमच्या पाठीशी असतात आणि त्यामुळेच सर्वसामान्यांसाठी काम करण्याची ऊर्जा मिळते.आपल्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी मी फोन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून उपलब्ध आहे,आपल्या शुभेच्छांचा नेहमी सन्मान केला आहे यापुढेही करत राहू.आपण सर्व माझ्या निर्णयाचे स्वागत कराल ही अपेक्षा बाळगते.


धन्यवाद..!!


~खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या