Ticker

6/Breaking/ticker-posts

अविस्मरणीय: ‘सरपंच.. शपथविधीसाठी आले थेट हेलिकॉप्टरमधून’

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर : गावातील महिलांना फेटे, वयोवृद्धांचं लेझीम पथक, बैलगाडीतून मिरवणूक, संपूर्ण गावात रांगोळी आणि तेवढ्यात डोंगराळ ग्रामीण भागात हेलिकॉप्टरमधून नवनियुक्त सरपंचाचे आगमन आणि तेही सरपंचपदाच्या शपथविधीसाठी... असा नयनरम्य सोहळा रंगला तो संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला गावात.

         
जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आज एक अनोखा शपथविधी पार पडला. सरपंचपदाची शपथ घेण्यासाठी सरपंचाचे थेट हेलिकॉप्टरने आगमन झाले. मुख्यमंत्र्याचा शपथविधी पार पडतो तशाच दैदिप्यमान शपथविधी सोहळा सरपंचाचा पार पडला. सरपंचाचे हेलिकॉप्टरने आगमन होताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि बारा बैलांच्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला गावात हा शपथविधी सोहळा रंगला. 

        गावातील उद्योजक तरुण जालिंदर गागरे यांच्या पुणे येथे विविध कंपन्या आहेत. शेकडो तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. जालिंदर गागरे व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात राहत असले तरी त्यांची आपल्या गावाशी नाळ जोडलेली आहे. गावाचा सर्वांगिण विकास करण्याच्या ध्येयाने त्यांनी गावची निवडणूक लढवली आणी त्यांचे संपूर्ण पॅनल 9 पैकी 9 जागा जिंकून बहुमताने विजयी झाले. योगायोगाने सरपंचपद सर्वसाधारण पुरुषाचे निघाल्याने जालिंदर गागरे आज सर्वानुमते सरपंचपदी विराजमान झाले. गावचा विकास हेच ध्येय असल्याचं जालिंदर गागरे सांगतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या