Ticker

6/Breaking/ticker-posts

तर.. ‘ईडी’ वर लोकांचा विश्वास राहणार नाही

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

.  नगर: 'राजकीय हेतूने प्रेरित होऊन तसेच सूडाची भावना लक्षात घेऊन ईडी सारख्या संस्थांचा वापर केला जाऊ नये. जर अशा पद्धतीने ईडीचा वारंवार वापर केला जात असेल, तर ईडी वर लोकांचा विश्वास राहणार नाही,' असे सांगतानाच मंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एकनाथ शिंदे यांनी आज महापालिका तसेच नगरपालिका प्रशासनाची आढावा बैठक घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी आमदार निलेश लंके यांच्यासह अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

'एखाद्या प्रकरणात तथ्य असेल तरच ईडी सारख्या संस्थांचा वापर करणे उचित ठरेल,' असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याबाबत मागणी जोर धरत आहे. त्याबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, 'औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे ही लोकांची मागणी आहे, व ती गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. हे नामांतराचे धोरण ठरवताना औरंगजेबाबाबत कोणालाही प्रेम असण्याचे कारण नाही. छत्रपती संभाजी महाराज ही आपल्या राज्याची व राष्ट्राची अस्मिता आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची मागणी लक्षात घेऊन त्याबाबत आम्ही आमची भूमिका ही स्पष्ट केले आहे. तसेच इतर शहराच्या नामांतरणबाबत तेथील लोकांची काही मागणी असेल ,तर जनतेसोबत आम्ही आहोत,' असेही शिंदे म्हणाले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या