Ticker

6/Breaking/ticker-posts

राम मंदिर उभारणीसाठी चिमुकल्यांनी दिले खाऊचे पैसे

  


लोकनेता न्यूज

साकत:-  ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) जामखेड तालुक्याती  साकत येथील चिमुकल्यांनी खाऊसाठी जमा केलेले पैसे अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीसाठी समर्पित करून दानाचा आदर्श निर्माण करीत खारीचा वाटा उचलला आहे .

  शंभुराजे मुरूमकर, समर्थ मुरूमकर, रियाश मुरूमकर, सार्थक चव्हाण, पृथ्वीराज वराट या चिमुकल्यांनी वडीलकांनी खाऊसाठी  दिलेले पैसे जमा करून श्रीराम मंदिराच्या भव्य निर्मितीसाठी समर्पित केले श्रीराम मंदिर      निधी संकलन करणारे स्वयंसेवक बाळासाहेब  वराट दिलीप मुरूमकर,  यांच्याकडे  सुपूर्द करण्यात आली यावेळी गावातील संजय (बापू ) मुरूमकर, आप्पासाहेब मुरूमकर, ग्रामपंचायत सदस्य सागर मुरूमकर ,पिंटू वराट राम मुरूमकर ,  अॅड.आबासाहेब मुरूमकर , काकासाहेब मुरूमकर ,ग्रामपंचायत सदस्य सागर मुरूमकर , सचिन मुरूमकर, ज्ञानदेव लहाने , गोविंद चव्हाण आदि उपस्थित होते .बालकाची धर्मप्रती निष्ठा राष्ट्रप्रेम तरुणाईला प्रेरणादायी असल्याने सर्व स्थरातून या बालकांचे कौतुक करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या