Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा बँक : अकोलेतून गायकर तर संगमनेर मधून कानवडे बिनारोध


 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

जिल्हा सहकारी बँकेचे दिद्यमान अध्यक्ष सिताराम पा . गायकर यांची अकोले तून तर माधवराव कानवडे यांची संगमनेर मधून बँकेवर बिनारोध निवड झाली . अकोले सेवा संस्था मतदार संघात गायकर यांच्या विरोधात माजी आ. वैभव पिचड यांचा अर्ज होता . मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पिचड यांची समजूत घातली , परंतु त्यास त्यांच्या मनाची तयारी होईना अखेर ना . थोरात यांनी हुकमी पर्याय वापरला अन् सोनाराने कान टोचल्यामुळे पिचड यांचा संभ्रम मिटला . त्यांनी माघार घेतल्या मुळे गायकर यांचा बिनविरोध चा मार्ग मोकळा झाला .

संगमनेर मतदार संघात ना . थोरात यांचे खंदे समर्थक माधवराव कानवडे यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली .  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या