Ticker

6/Breaking/ticker-posts

शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणार- बाळासाहेब बोराटे

 रमाई आवास योजनेंतर्गत धनादेशाचे वाटप 

लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

 अहमनगर: शासनाच्या सर्वसामान्यांसाठी विविध योजना आहेतया योजना संबंधितापर्यंत पोहचविणे गरजेचे आहेआज अनेकांना या योजनांची माहिती होत नाहीतेव्हा मनपाने याबाबत अधिक जागृती करणे महत्वाचे आहेत्याचबरोबर योजनेचा लाभ घेतलेल्या नागरिकांनीही इतरांना याबाबत माहिती द्यावी.  रमाई योजनेंतर्गत घर बांधण्यासाठी  अडीच लाख रुपयांचे अनुदान टप्याटप्प्याने मिळत असतेया योजनेबाबत कोणाला काही अडचण असल्यास त्यांनी संपर्क साधावाआपण याबाबत सहकार्य करुअसे प्रतिपादन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले.

     राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या रमाई आवास योजनेंतर्गत माळीवाडा बौद्ध वस्ती येथील लाभार्थी विकास भिंगारदिवे यांना नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते पहिला हप्ता 82,500 रुपयांचा धनादेश देण्यात आलायाप्रसंगी  विशाल वालकरहर्षल म्हस्केतारिक कुरेशीबाबा पटवेकर आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी लाभार्थी विकास भिंगारदिवे म्हणालेशासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येकाने घेतला पाहिजेशासकीय योजनांसाठी थोडे कष्ट होत असले तरी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या सहकार्याने आज पहिला हप्त्याचा धनादेश मिळाला आहेआता चांगले घर बांधकाम निर्माण होण्यास मोठी मदत यामुळे झाली असल्याचे सांगून आभार मानले.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या