.
क्षणचित्रे
*' जोर का धवका धिरेसे' मंत्री थोरात व विखेंच्या स्वतंत्र बैठका.
* खा . डॉ . सुजय विखे पा . यांची विळद घाटात बैठक
* मंत्री बाळासाहेब थोरात व मंत्री प्राजक्त तनपुरे आ. आशुतोष काळे यांच्या लता - कुंज बंगल्यावर
* काँग्रेस - राष्ट्रवादीचे मा आ . नरेंद्र घुले . जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके . आ .सुधीर तांबे आदिंसह उमेदवार व कार्यकर्ते पदाधिकारी जि. प . उपाध्यक्ष प्रताप शेळके यांचे बंगल्यावर
* मा . आ . वैभव पिचड यांची माघार - सिताराम गायकर यांचा राष्ट्रवादीच्या मदतीने बिनविरोध चा मार्ग मोकळा
* अमित भांगरे OBC प्रवर्गातून मैदानात
* श्रीगोंदा - वैभव पाचपुते की राहुल जगताप चर्चा सुरुच
* कर्जत - अंबादास पिसाळ की मिनाक्षी साळूंके चर्चेत
* मुरकुटे पिता - पुत्र आघाडीच्या तंबूत
* नगर मधून मा आ . शिवाजीराव कर्डिले बिनविरोध च्या अगदी जवळ
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अ . नगर : जिल्हा बॅकेसाठी आजचा दिवस सकाळ पासूनच उत्कंठावर्धक ठरला असून वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत . माजी मंत्री विखे पा . व विद्यमान मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात समझोता घडवून आणण्यासाठी खलबतं झडत आहेत .
ना . थोरात व ना. तनपुरे लता कुंजवर बसून सूत्र हलवित आहेत . नेत्यांचा आदेश आला की लगेच त्याप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी आघाडीची मंडळी प्रताप शेळके यांचे बंगल्यावर 'अलर्ट ' वर आहे . वरील प्रमाणे क्षणचित्रे दिसून आली . आणखीही तासाभरात वेगवान हालचाली घडतील .
आशिया खंडात अग्रेसर असलेल्या जिल्हा सहकारी बँकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी जिल्ह्यातील मात्तबर नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून सहमती चे निकराचे प्रयत्न चालविले आहेत. अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस असून तडजोडीसाठी बैठका सुरु आहेत . प्राथमिक अंदाजानुसारच पक्ष अभिनिवेश बाजूला पडला असून विखे विरुद्ध थोरात असेच चित्र निर्माण झाले आहे . विखे पाटलांनी निकराचे प्रयत्न करूनही अंतिम टप्प्यात मंत्री थोरातांची सहमती एक्सप्रेस जोरात धावू लागली आहे . उर्वरित जागा पैकी काही जागांवर तडजोड झाल्याची माहिती आहे . काही जागावर दोन्ही गटांनी दावा केल्याने पेच निर्माण झाला आहे . त्यावर तासाभरात काय तो निर्णय होऊन अंतिम चित्र स्पष्ट होईल .
0 टिप्पण्या