Ticker

6/Breaking/ticker-posts

वांबोरी चारी टप्पा दोनचा विषय लवकरच मार्गी लावणार-मंत्री तनपुरे

 


लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

पाथर्डी /करंजी- :-तालुक्यातील करंजीसह चौदा गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारी टप्पा दोनचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे संकेत मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले आहेत. वांबोरी चारीच्या थकित पाणीपट्टी बाबत कौडगाव आठरे येथे लाभधारक शेतकऱ्यां सोबत झालेल्या बैठकीमध्ये मंत्री तनपुरे बोलत होते. राहुरी नगर पाथर्डी मतदार संघाचा लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस मतदारांनी मला संधी दिली त्याच्या पहिल्याच वर्षी लाभधारक तलावात मुबलक पाणी सोडण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न केला. विशेषतः पाथर्डी तालुक्यातील गावांना प्राधान्याने पाणी देऊन आम्ही पाणी देणारे आहोत अडवणारे नाहीत हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण केला वांबोरीचारी टप्पा दोनच्या कामासाठी लवकरच कोरोणाची परिस्थिती पाहून राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांच्या सोबत आठ दिवसात बैठक आयोजित करून टप्पादोनचा विषय देखील लवकरच मार्गी लावणार असल्याची ग्वाही मंत्री तनपुरे यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.

 पहिल्या टप्प्यात झालेली वांबोरी चारी चालवण्यासाठी लाभधारक शेतकऱ्यांनी देखील पाणीपट्टी भरण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत ज्या शेतकऱ्यांना वांबोरी चारीच्या पाण्याचा लाभ मिळाला आहे त्या शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरण्यासाठी सकारात्मक भुमिका घेतली पाहीजे तसेच पाणी मिळूनही पाणीपट्टी न भरणाऱ्या तलावाचा पाणीपुरवठा बंद करावा. तसेच ज्या लाभधारक शेतकऱ्यांची पाण्याची मागणी आहे त्यांना पाणी देऊन त्यांच्याकडून पाणीपट्टी घ्यावी अशी देखील भूमिका उपस्थित शेतकऱ्यांनी यावेळी मंत्री तनपुरे यांच्यापुढे मांडली. ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे आणि ती व्यवस्थीत चालावी ही जबाबदारी देखील लाभधारक शेतकऱ्यांची आहे त्यासाठी  शेतकऱ्यांची देखील सकारात्मक भूमिका असावी असे मंत्री तनपुरे यावेळी म्हणाले.

  या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य मोहनराव पालवे, वांबोरी चारी कृती समितीचे अध्यक्ष अरुण पाटील आठरे, उपाध्यक्ष बाबासाहेब भिटे, माजी सभापती संभाजी पालवे, ज्येष्ठनेते संभाजी वाघ, मुळा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे, बबनराव गुंजाळ, शिवसेना तालुका संघटक राजेंद्र म्हस्के, सरपंच राजेंद्र पाठक, विलास टेमकर, रवींद्र मुळे, सचिन शिंदे, युवानेते अशोक टेमकर, पृथ्वीराज आठरे, बाबासाहेब बुधवंत, महेश लवांडे, तुळशीराम शिंदे, सुखदेव गीते, अंबादास कारखेले, बाबासाहेब कारखेले, हरिभाऊ कारखेले,अविनाश कारखिले, भाऊसाहेब दहिफळे, शिवाजी पालवे , चेअरमन शिवाजी लवांडे, प्रा विठ्ठल मरकड, तुकाराम वांढेकर, संतोष आठरे, ज्योतिबा आठरे, अण्णासाहेब होंडे, भाऊसाहेब वांढेकर, आदी प्रमुख शेतकरी या वेळी उपस्थित होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या