Ticker

6/Breaking/ticker-posts

प्रशांत गायकवाड यांची कारकिर्दही उज्वल -भगवान फुलसौंदर

 

मोरया पतसंस्थेच्यावतीने सत्कार


लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

  नगर - पारनेर तालुका बाजार समितीच्या माध्यमातून प्रशांत गायकवाड यांनी आपल्या कामाने बाजार समितीचा लौकिक वाढविला आहे.  शेतकरी, व्यापारी, हमाल-मापाडी यांच्या प्रश्‍नांसाठी पुढाकार घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या कार्याची धडाडी पाहूनच त्यांना जिल्हा बँकेचे उमेदवारी देण्यात आली. अटीतटीच्या लढतीत त्यांनी विजय संपादन केला, ही त्यांच्या चांगल्या कार्याची पावतीच म्हणावे लागेल. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी एक हक्काचे पद त्यांना मिळाल्याने पुढील कारकिर्दही उज्वल राहील, असा विश्‍वास माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले.

जिल्हा बँकेच्या संचालकपदी प्रशांत गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल मोरया पतसंस्थेच्यावतीने माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सीए किरण भंडारी, विनायक काळे, प्रदीप बोरुडे, महादेव कराळे, सुनिल राऊत, अंबादास चौधरी, गुलाब कराळे आदि उपस्थित होते.

सत्कारास उत्तर देतांना प्रशांत गायकवाड म्हणाले, सामाजिक कार्याचा वारसा घरातूनच मिळाल्याने आपण लोकांच्या कामांना प्राधान्य देत गेला. त्या माध्यमातून विविध पदे मिळत गेली. सर्वांच्या सहकार्याने आपण प्रत्येक क्षेत्रात काम करतो.  जिल्हा बँकेचा संचालक म्हणून शेतकरी, सर्वसामान्यांच्या कामांना प्राधान्य देऊन चांगले काम करु. केलेल्या सत्कारातमुळे आपणास पाठबळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या