Ticker

6/Breaking/ticker-posts

बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी जालिंदर बोरुडे

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर ः महाराष्ट्र राज्य बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी जालिंदर बोरुडे यांची निवड करण्यात आली. राज्याध्यक्ष एस.आर. भोसले यांनी बोरुडे यांना नियुक्तीचे पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

महाराष्ट्र राज्य बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या माध्यमातून कर्मचार्यांचे विविध प्रश्न शासनस्तरावर सोडविण्यासाठी कार्य सुरु आहे. अधिकारी व कर्मचारी यांचे न्याय हक्क अबाधित राहण्यासाठी व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार असल्याची भावना जालिंदर बोरुडे यांनी व्यक्त केली. 

सामाजिक काम करण्याची तळमळ व संघटनेच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सुरु असलेले कार्य पाहून बोरुडे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे राज्याध्यक्ष एस.आर. भोसले यांनी स्पष्ट केले. संघटनेची लवकरच प्रत्येक तालुकास्तरीय कार्यकारणी नियुक्ती करण्याचे तसेच नवीन सभासद नोंदणी अभियान घेण्याचे बोरुडे यांनी जाहिर केले. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या