Ticker

6/Breaking/ticker-posts

‘तक्षज्ञ’ मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

जगाच्या पाठीवर एकव चारित्र्यवान राजा - प्रा. मुसमाडे







लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नगर : -या जगात अनेक राजे - महाराजे होऊन गेले . अनेकांनी पराक्रम गाजविले असले तरी मुठ्भर मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे अतुलनीय शौर्याचे प्रतिक असून जगाच्या पाठीवर एकमेव चा रि त्र्यवान राजा होऊन गेले असे प्रतिपादन प्रा . जगदीश मुसमाडे यांनी केले .

आरडगाव (ता.राहुरी) येथील तक्षज्ञ ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस् कॉमर्स अँड सायन्सच्या वतीने  शिवजयंती उत्सहात साजरी करण्यात आली . यावेळी प्रा. जगदीश मुसमाडे यांनी 'महाराजांचे चरित्र ' या विषयावरती व्याख्यान दिले . त्यावेळी ते बोलत होते .

 प्रास्ताविक प्रा.अनाप यांनी केले व अध्यक्षीय सूचना प्रा. सय्यद यांनी दिले अनुमोदन प्रा. वाघ यांनी केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जगदीश मुसमाडे यांनी स्वीकारले . छगपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी  प्रा. राहुल बोरुडे व कला शाखेचे विद्यार्थी संग्राम म्हसे व सुनील खिलारी यांनी महाराजांचा पोवाडा सादर केला. आरडगाव याठिकाणी  बस स्टॅन्ड व गावात स्वच्छता करण्यात आली.

यावेळी वेदांत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब भानुदास मुसमाडे, प्राचार्य जगदिश मुसमाडे,  महेश मुसमाडे, राहुल बोरुडे, सागर वाघ, सायली सौदागर, गौरी सूर्यवंशी, अफरोज सय्यद, संतोष अनाप, सोनाली शिरोळे, निकिता कारले, प्रियाली दरंदले, हेडक्लार्क सलीम पठाण आणि आकाश बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.  व आभार शिरोळे मॅडम यांनी केले. तसेच सोशल डिस्टंसिंग ठेवून कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या