Ticker

6/Breaking/ticker-posts

डॉ. भगवान मुरूकर यांच्या लढ्याला यश .. साकत - जामखेड रस्त्याचे काम सुरु


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )


मराठवाडयाचे प्रवेशद्ध साकतचा प्रवास सुखकर?  

साकत : .माजी सभापती डॉ. भगवान मुरूकर  यांच्या लढ या ला यश आले असूूून -साकत रस्त्यावरील सावरगाव फाटा ते साकत पर्यंत रस्त्याच्या कामासाठी २ कोटी ५६ लाख रुपये मंजुर  असुन काम सुरू झाले आहे. काम चांगल्या प्रतिचे करून घेऊ व लवकरात लवकर काम पुर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे  शाखा अभियंता शशीकांत सुतार  यांनी रस्त्याच्या कामाला भेट दिली त्यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी ठेकेदार संजय डोके सोबत होते.


    साकत  मार्ग पाटोदा या रत्याची खड्ड्यांमुळे इतकी दुर्दशा झाली होती. की खड्ड्यांमधून प्रवास करताना वाहनधारक अक्षरशः मेटाकुटीला आला होता. रस्त्याच्या या अवस्थेमुळे दुचाकी व चारचाकी गाड्यां सह वाहनधारकांचे शरीराचे अवयव निकामी होण्याची वेळ आली होती माजी सभापती डॉ. भगवान मुरूकर यांनी रस्ता रोको अंदोलन देखील केले होते.तसेच .साकत गावातून जाणारा  हा रस्ता मराठवाड्यात प्रवेश  करणारा रस्ता असल्याने मराठवाडयाचे प्रवेशद्ध म्हणुन साकतची ओळख आहे .


हा मार्ग  वाहतुकीसाठी पूर्णपणे धोकादायक बनला होता हा रस्ता  राज्यमार्ग क्रमांक 156 असून  रस्ता दुपदरी करण्याची अनेक वर्षांची मागणी होती ती पुर्ण होत असल्याने जामखेड -साकत प्रवास सुखकर होणार आहे . त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे .


  सार्वजनिक बांधकाम विभागाचे  उपअभियंता  संजय कांबळे यांचे साकत रस्त्याच्या कामाकडे लक्ष असुन रस्त्याचे काम चांगल्या प्रतिचे करण्यासाठी आम्ही रस्त्याच्या कामाची  नेहमी पाहणी करून काम चांगल्या प्रतिचे करून घेऊ व लवकरात लवकर काम पुर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे सुतार यांनी सांगितले .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या