Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा..

 

लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

मुंबई : हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यातल्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला मध्यरात्री अवकाळी पावसानं झोडपलं. सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद अकोला, परभणी, भंडारा या जिल्ह्यांसह अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. सांगलीतल््य अवकाळीच्या धुमाकुळानं द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात आलाय. अनेक भागांमधील द्राक्षाची निर्यात झाली नाही. त्यामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेत आहे. तिकडे परभणीतल्या पावसानं ज्वारी, हरभरासारख्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. वाशिममध्ये पावसाच्या सरी कोसळल्या.

परभणी : जिल्ह्यात काल रात्री अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. परभणी, पोखर्णी, दैठणा या परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे ज्वारी, हरभरा पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.


सांगली : जिल्ह्यात मध्यरात्री अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. विजेच्या कडकडाटासह अर्धा तास मुसळधार पाऊस पडला. यामुळे रात्री अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. अवकाळी पाऊस पडल्याने पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना मोठा फटका बसणार आहे.


उस्मानाबाद : तालुक्यातल्या उपळा गावासह काही भागात रात्रीसाडे आठनंतर पावसाचा शिडकावा झाला. उस्मानाबाद शहर आणि परिसरामध्ये काल ढगाळ वातावरण पाहायाला मिळालं. या पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.


सातारा : काल मुसळधार पाऊस झाला. अवकाळी झालेल्या पावसामुळे किमान तापमानातही घट झाली आहे.

अकोला : जिल्ह्यातल्या अकोट, तेल्हारा भागात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी बरसणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे..


भंडारा : काल अवकाळी पावसाला सुरुवात झाली. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडाली..

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या