Ticker

6/Breaking/ticker-posts

'रंगतारा' म्हणजे तात्यासाहेबांचं समृद्ध आयुष्य - डॉ सर्जेराव निमसे

 
लोकनेता न्यूज ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर-- माणसाने आयुष्यात जगताना दूरदृष्टी व सामाजिक दृष्टिकोन ठेवून जगले पाहिजे प्रा रंगनाथ भापकर यांचे समृद्ध आयुष्य तरुणांना प्रेरणा देणारे आहे त्यांच्या आयुष्याचा समग्र जीवनपट त्यांच्या पत्नी सौ तारका भापकर यांनी रंगतारा या ग्रंथातून मांडला आहे असे प्रतिपादन लखनऊ विद्यापीठाचे मा कुलगुरू  डॉ.सर्जेराव निमसे यांनी केले.

गणराज प्रकाशन अहमदनगर यांनी मराठी भाषा सप्ताहानिमित्त त्यांनी विविध साहित्यिक उपक्रम आयोजित केले यामध्ये नुकताच प्रा रंगनाथ भापकर तथा तात्यासाहेब यांच्या संघर्षमय हृदयस्पर्शी जीवन कार्यावर आधारित व सौ तारका भापकर लिखित रंगतारा चरित्र ग्रंथ व इंजी.मंगेश भापकर संपादित तात्यासाहेब ग्रंथ प्रकाशन सोहळा व सेवानिवृत्ती गौरव समारंभ नुकताच संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व लेखिका मनोगत लेखिका सौ तारका भापकर यांनी केले यावेळी विचारपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ सर्जेराव निमसे प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक सिने गीतकार बाबासाहेब सौदागर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ संजय कळमकर ,साहित्य परिषदेचे चंद्रकांत पालवे ,प्राचार्य अशोक दोडके.जिल्हा मराठा संस्थेचे संस्था अधीक्षक मोडवे भाऊसाहेब.दत्ता पाटील नारळे.फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे.नारायणगाव येथील मानसोपचार तज्ञ डॉक्टर घाडगे पाटील सत्कारमूर्ती रंगनाथ भापकर व सौ तारका भापकर.मंगेश भापकर प्रकाशक ग ल भगत आदी  विचारपीठावर उपस्थित होते

यावेळी सेवानिवृत्ती गौरव समारंभाच्या निमित्ताने रंगनाथ भापकर यांचा गौरव समितीच्या वतीने व रेसिडेन्शिअल हायस्कूल च्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच गणराज प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या रंगतारा व तात्यासाहेब या पुस्तकांचा पुस्तक प्रकाशन सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.याप्रसंगी इंजिनीयर मंगेश भापकर सत्कारमूर्ती तात्यासाहेब  भापकर डॉ. स्नेहल घाडगे.दत्ता पाटील नारळे चंद्रकांत पालवे.प्राचार्य अशोक दोडके आदींनी आपली मनोगत व्यक्त केली.

याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक बाबासाहेब सौदागर म्हणाले की मराठी भाषा संवर्धनासाठी गणराज प्रकाशन अविरतपणे कार्यरत आहे नवोदितांना लिहित करणेसाठी साहित्यकृती निर्माण करणं तरल व भावस्पर्शी ग्रंथ असून तात्यासाहेब यांच समृद्ध आयुष्य ते जगले त्यांचा तो जीवनपट सर्वांना प्रेरणादायी आहे असे सौदागर यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर संजय कळमकर म्हणाले की माणसानं संवेदनशील मनांना आयुष्य जगले की त्याची प्रचिती येते तात्यासाहेब हे खरे अभिनय संपन्न जीवन जगले सर्व क्षेत्रात उत्तुंग काम करणारा नेतृत्व संपन्न कर्तृत्व म्हणजे तात्यासाहेब आहेत हा सर्व त्यांच्या हृदयस्पर्शी रोमहर्षक जीवनपट त्यांच्या ग्रंथातून उलगडला आहे.तात्यासाहेब आयुष्याच्या रंगमंचावर यशस्वी झाले आहेत असे ते म्हणाले.

डॉ. निमसे पुढे म्हणाले की माणसानं कष्टाळू सेवाभावी व संवेदनशील असले पाहिजे. तात्यासाहेबांच जीवन पुढील पिढ्यांना निश्चित दीपस्तंभासारखे आहे .त्यांच्या जीवन कार्या वरील हे दोन्ही ग्रंथ निश्चित चरित्र साहित्य प्रकारात भर घालणारे आहेत.गणराज प्रकाशनाचे काम साहित्य क्षेत्रात प्रभावी पणे चालू असून अनेक साहित्यिकांना उभं करण्याचं काम  केले.याची प्रचिती या साहित्य सोहळ्यातून येते असे सांगून. आज विज्ञान दिन या विज्ञान दिनाची आठवण करुन देताना मराठी भाषा दिन व विज्ञान यांचा समन्वय घडला की निश्चित भविष्यात चांगल्या साहित्यकृती घडतील असे सांगितले 

 प्रकाशक ग ल भगत यांनी आभार मानले तर श्री संजय आखाडे यांनी सूत्रसंचालन केले . महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासनाने कोरोना साथीच्या आजाराविषयी घालून दिलेले सर्व नियम अटी शर्ती यांचे काटेकोर पालन करत कालक्रम  झाला .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या