Ticker

6/Breaking/ticker-posts

सावधान : कोरोना पाठोपाठ , बिबट्याही पुन्हा आला रे ..!

 





लोकनेता न्यूज ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

पाथर्डी : तालुक्यातील मढी परिसरात तीन महिन्यापूर्वी बालकांना पळवून नेण्याची घटना घडल्या पासून बिबट्या चं नांव काढलं तरी अंगावर काटा येतोय . अशातच काल बुधवारी साळवे वस्ती जवळ बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे .


याबाबत मिळाले ली माहिती अशी की . बुधवारी सायंकाळच्या सुमारास मढी येथील साळवे वस्ती परिसरात बिबट्या दिसल्याचे विजय साळवे यांनी सांगितले . तशी माहिती साळवे यांनी वनविभागास दिली . त्यानुसार तिसगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघूल कर यांनी कर्मचाऱ्यां सह साळवे वस्तीवर जाऊन पाहणी केली . पाहणीतील निष्कर्षानुसार या परिसरात बिबट्या चे ठसे आढळून आले असून तो येथून पुढे मायंबा गडाकडे गेल्याचे पाऊल खुणा मिळाल्याचे स्पष्ट झाले . त्यानुसार वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या परिसरात पिंजरे लावले आहेत .


बिबट्याच्या माहिती नंतर वनविभागाने मढी . घाटशिरस व शिरापूर परिसरात पिंजरे लावण्याचे काम सुरु केले असून या परिसरातील नागरिकांनी रात्री च्या वेळी बाहेर पडू नये .. पुरेशी खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे .


कोरोना अन् बिबट्याचे काय नाते आहे . हे न उलगडणारे कोडे आहे.याच आठवड्यात कोरोना परतला आहे . कोरोनाचे पाठोपाठ आता बिबट्याही पुन्हा  हजर झाल्याने नागरिकांची पाचावर धारण बसली आहे . मढी . केळवंडी . शिरापूर येथील ३ बालकांचे बिबट्याने प्राण घेतल्याची घटना ताजी असतांना पुन्हा बिबट्या अवतरल्याने या दुःखद आठवणी जाग्या झाल्या आहेत . पाथर्डी तालुका विशेषतः डोंगर परिसर भितीच्या सावटाखाली आला आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या