Ticker

6/Breaking/ticker-posts

सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही- प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

 अहमदनगर :-  “राजकारणात आयुष्य उभं करायला, राजकीय स्तरावर यायला अनेक कष्ट घ्यावे लागतात, कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही. धनंजय मुंडेनी आपली भुमिका स्पष्ट केलीय. हायकोर्टात देखील यापुर्वीच अर्ज दाखल केला आहे, ही न्यायालयीन बाब आहे. अंतर्गत कुटुंबातील बाब आहे. ”  अशा  शब्दांत  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अहमदनगर येथील एका कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली

           राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेनी  फेसबुकवर काल (12 जानेवारी) करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबतच्या संबंधांची कबुली दिली. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली.

राजकारणात आयुष्य उभं करायला, राजकीय स्तरावर यायला अनेक कष्ट घ्यावे लागतात. कोणी आरोप केल्यावर सत्यता न पडताळता लगेच निष्कर्षावर येणं योग्य नाही. धनंजय मुंडेनी आपली भुमिका स्पष्ट केलीय. हायकोर्टात देखील यापुर्वीच अर्ज दाखल केला आहे. ही न्यायालयीन बाब आहे. अंतर्गत कुटुंबातील बाब आहे. धनंजय मुंडेंनी याबाबत स्पष्ट मत व्यक्त केलं आहे”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्यावरही आरोप झाले. या प्रकरणाचा खुलासा झाला. यात काही अर्थ नसल्याचं निष्पन्न झालं. कोणीही आरोप केले म्हणजे अंतिम निष्कर्षला पोहोचणे योग्य नाही. मुंडे यांच्याबाबतही याबाबत‌ चौकशी होईल, खुलासा होईल. त्यांनी जो खुलासा केला तो समोर आहे”, असं मत त्यांनी

          धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेतली मंडळी काय बोलणार, काय प्रतिक्रिया देणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी धनंजय मुंडे यांचं हे कौटुंबिक प्रकरण आहे. याविषयावर मी अधिक काही बोलणार नाही. याविषयी तेच बोलतील. परंतु त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणातून त्यांची बाजू समजलेली आहे”, असं मलिक म्हणाले.       

 दूध का दूध, पानी का पानीहोईल

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. विरोधी पक्षनेता आणि राजकारणी म्हणून धनंजय मुंडे यांचे कार्य मोठे आहे. मी छोटा माणूस आहे. धनंजय मुंडे हे पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यावर मी अधिक बोलणे योग्य ठरणार नाही.

काँग्रेसकडूनही पाठरान भाजपला टोला  - दुसरीकडे हिंदु धर्मात दोन लग्न किंवा पत्नी पत्नी कायद्याने गुन्हा आहे, अशी भूमिका भाजपच्या महिला आघाडीने घेत मुंडे यांच्यावर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने . भाजप महिला आघाडीच्या भूमिकेनंतर भाजपच्या नेत्यांना आता टेन्शन आलं असेल”, असा टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला  लगावलाय.

शिवसेनेचे नो कॉमेंट्स

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेनंतर मुंडे प्रकरणी शिवसेना काय भुमिका घेते, याकडे लक्ष लागलं असतानाच एकनाथ शिंदे यांनी मात्र याविषयावर न बोलता नो कॉमेंट्सचा पवित्रा घेतला. आता दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार याप्रकरणी काय भुमिका घेतात, तसंच पुढे काय पाऊल टाकतात, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

          दरम्यान या सर्व  प्रकरणात सत्ताधारी आघाडी मुंडे यांच्या पाठीशी तेवढ्याच खंबीरपणे उभी राहिली असल्याचे चित्र निर्माण झाल्याने विरोधी भाजप नेत्यांच्या आरोपातील हवा निघून चालली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे फायरब्रंड नेते  मुंडे यांची नेहमीप्रमाणे या संघर्षातूनही वाटचाल सुरूच राहील असा रागरंग आहे .     

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात राहत आहात हे विसरलात कोणतीही महिला आपली जाणीवपुर्वक बेअब्रू करणार नाही तिच्यावर अंण्याय झालाय. हे सत्य आहे.

    उत्तर द्याहटवा
Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)