Ticker

6/Breaking/ticker-posts

ऐतिहासिक वस्तुत संग्रहालय: नागरिकांसाठी लवकरच खुले ,महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली भेट

 

    नगर :- ऐतिहासिक वस्‍तु संग्रहालय नुतनीकरणाचे काम सुरू आहे. या वस्‍तुसंग्रहालयात फार पूर्वीच्‍या काळामधील अत्‍यंत दुर्मळ अशा वस्‍तु पाहावयास ठेवण्‍यात आलेल्‍या आहेत. ऐतिहासिक वस्‍तुचे अत्‍यंत चांगल्‍या प्रकारे जतन करण्‍यात आले आहेत. त्‍या ठिकाणी जिल्‍हयातून,
राज्‍यातून व देशभरातून पर्यटक येत असतात. आजच्‍या नविन पिढीला ऐतिहासिक वस्‍तुची माहिती या निमित्‍ताने होत आहे. ऐतिहासिक वस्‍तु संग्रहालयात असलेल्‍या वस्‍तु व त्‍याची माहिती त्‍या ठिकाणी दिलेली आहे. त्‍या दृष्टिने या ऐतिहासिक वस्‍तु संग्रहालयाचे नुतनीकरणाचे काम अत्‍याधुनिक पध्‍दतीने करण्‍यात येत आहे. नुतनीकरणाचे काम अंतिम टप्‍प्‍यात असून लवकरच ऐतिहासिक वस्‍तु संग्रहालय नागरिकांसाठी खुले करण्‍यात येणार आहे.

     या ऐतिहासिक संग्रहालयामुळे नगर शहराच्‍या नांव लौकिकात भर पडणार आहे. तरी नागरिकांनी विशेषत: तरूण वर्गांनी या ऐतिहासिक वस्‍तु संग्रहालयास भेट दयावी व पूर्वीच्‍या काळातील ऐतिहासिक वस्‍तु पाहण्‍याचा आनंद घ्‍यावा. ऐतिहासिक वस्‍तु संग्रहालयाचे कार्याध्‍यक्ष तथा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी भेट दिली, यावेळी ऐतिहासिक वस्‍तु संग्रहालयाचे अध्‍यक्ष तथा जिल्‍हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी त्‍यांचे स्‍वागत केले. यावेळी भाजपा मंडल अध्‍यक्ष अजय चितळे, भाजपा शक्‍तीकेंद्र प्रमुख पुष्‍कर कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते पंगुडवाल,राहुल रोहोकले आदी उपस्थित होते.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या