Ticker

6/Breaking/ticker-posts

पाथर्डी तालुका : सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

 


लोकनेता न्यूज
  ऑनलाईन

पाथर्डी;-पाथर्डी तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण आज सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले. यामध्ये अनुसुचित जाती ८ पैकी ४ महिला व ४ सर्वसाधारण. अनुसुचित जमातीसाठी १ महिला.नागरिकांचा मागास प्रवर्ग २९ पैकी १४ महिला व १५ सर्वसाधारण आरक्षित करण्यात आले आहे.सर्वसाधारण खुला प्रवर्गात ६९ पैकी ३५ महिला व ३४ सर्वसाधारण असे १०७ सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले.

  पाथर्डी तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत तहसील कार्यालयात प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी तहसीलदार शाम वाडकर,नायब तहसीलदार पंकज नेवसे यांच्यासह विविध गावातील ग्रामस्थ व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 पाथर्डी तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतीसाठी निघालेले आरक्षण पुढील प्रमाणे-

 अनुसुचित जाती (सर्वसाधारण)- तिनखडी,कोल्हार, भालगाव, हनुमान टाकळी,(महिला)माळी बाभूळगाव, मोहरी, जवखेडे दुमाला, शिंगवे केशव,अनुसुचित जमाती (महिला) अंबिकानगर

 नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण)राखीव ;- कौडगाव,डांगेवाडी, करोडी,वडगाव, आडगाव,निवडुंगे,भारजवाडी, मिडसांगवी, जांभळी, ढाकणवाडी, पिंपळगाव टप्पा,डोंगरवाडी,शिराळ,आल्हनवाडी शिरापूर. (महिला) राखीव -साकेगाव,शंकरवाडी, मिरी, हत्राळ, पिरेवाडी, कोरडगाव,औरंगपूर,कळसपिंप्री, कोळसांगवी, दैत्यनांदूर, धामणगाव,जवळवाडी,पिंपळगव्हाण,धनगरवाडी. 

 सर्वसाधारण प्रवर्ग ( व्यक्ती ) राखीव ;-रेणुकावाडी,कामत शिंगवे,गितेवाडी,राघोहिवरे,मांडवे, सोमठाणे खुर्द, सातवड, घाटशिरस, चितळी, पाडळी, पागोरी पिंपळगाव, कासार पिंपळगाव, दुलेचांदगाव, आगसखांड,रांजणी, पत्र्याचा तांडा, घुमटवाडी, चितळवाडी, लांडकवाडी, तोंडोळी, खरवंडी कासार, अकोला, मालेवाडी, एकनाथवाडी, भिलवडे, चिंचपूर इजदे,मोहोज खुर्द, मोहज बु.,चिचोंडी, देवराई, खांडगाव, जवखेडे खालसा, मढी,भुतेटाकळी. 

सर्वसाधारण प्रवर्ग  (महिला) राखीव ;- डमाळवाडी, धारवाडी, पारेवाडी,तिसगाव, लोहसर,वैजूबाभूळगाव,दगडवाडी, भोसे, करंजी, सांगवी बुद्रुक,खेर्डे ,कारेगाव,शिरसाटवाडी, केळवंडी,माणिकदौंडी, जाटदेवळे, सुसरे, सोमठाणे नलवडे, सोनोशी, जिरेवाडी, शेकटे, मोहटे,मोहोज देवढे, चिंचपूर पांगूळ, कडगाव, कोपरे,ढवळेवाडी, सैदापूर, बोरसेवाडी, निपाणी जळगाव, येळी, मुंसूसवाडे,जोगेवाडी,टाकळीमानूर,वाळुंज.याप्रमाणे आरक्षण जाहीर झाले आहे.

 नुकत्याच तालुक्यात ७८ गावातील ग्रामपंचायतीच्या पार पडल्या यातील निवडून आलेले काही सदस्यात नाराजी तर काहींमध्ये आनंद पाहावयास मिळाले. आपल्या पॅनच्या हिशोबाने आरक्षण जाहीर झाल्याने उत्साहाने कार्यकर्त्याने तहसील कार्यालयाच्या आवारात गुलालाची उधळ करत जल्लोष साजरा केला. अनेक गावांत ज्या पॅनलच्या जागा जास्त निवडून आल्या मात्र आरक्षणाची जागा विरोधकांकडे गेल्याने मोठी अडचण झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या