Ticker

6/Breaking/ticker-posts

अण्णांना पाठिंबा ही आपली चूक

 


लोकनेता न्यूज

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली :   माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्या भेटीत झालेल्या चर्चेनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ३० जानेवारी पासून सुरू होणारं आपलं उपोषण स्थगित केल्याची घोषणा केली. यावर  उलट -सूलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत .बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ट्वीटद्वारे अण्णांना पाठिंबा देणे आपली चूक असल्याची प्रतिक्रिया नोंदविली आहेे .

दिग्दर्शक हंसल मेहता यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, 'मी ज्याप्रमाणे अरविंदला पाठिंबा दिला होता त्याच विश्वासाने मी अण्णा हजारे यांचेही समर्थन केले होते. मला याचे दुःख नाहीए कारण आपण सगळेच चुका करतो. मीसुद्धा 'सिमरन' सिनेमा केला होता.' हंसल यांच्या ट्वीटवरून हे स्पष्ट होते की, अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणंही त्यांची चूक होती. हंसल यांच्या या ट्विटवर बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या