Ticker

6/Breaking/ticker-posts

औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे करा नेवासा मनसेचे आंदोलन

 


नेवासा :-औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे करा या मागणीसाठी नेवासा बसस्थानक व नेवासाफाटा येथे मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येऊन एस.टी.बसेसवर छत्रपती संभाजीनगर असे स्टिकर लावण्यात आले.

            हिंदवी स्वराज्याचे रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव औरंगाबाद शहराला येत्या २६ जानेवारी पर्यंत देण्यात यावे,यासाठी नेवासा येथील एस.टी. बस स्थानकातील औरंगाबादकडे जाणाऱ्या एस.टी. बसेसवर छत्रपती संभाजी नगर नावाचे फलक लावण्यात आले.आंदोलन प्रसंगी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो या आघाडी सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

            यावेळी झालेल्या आंदोलनात महसूलमंत्री नामदार थोरात यांनी संभाजीनगर नावाला विरोध दर्शविल्याने त्यांचा निषेध करण्यात आला.यावेळी मनसे तालुका अध्यक्ष दिगंबर पवार,तालुका उपाध्यक्ष योगेश काळे,नेवासा विधानसभा विभाग अध्यक्ष रविंद्र पिंपळे,तालुका सचिव अविनाश गाढवे,विद्यार्थी तालुका अध्यक्ष ऋषिकेश जंगम,तुषार शेळके,मयूर नरोडे,कमलेश नवले,अक्षय आरगडे सदस्य शुभम कुसळकर यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या