Ticker

6/Breaking/ticker-posts

ना . मुंडेंवर सोमय्यांचा हल्लाबोल , शरद पवारांची भूमिका काय ?


 मुंबई : धनंजय मुंडेंच्या फेसबुक पोस्टनंतर भाजपने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. इतकंच नाही तर सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरही हल्ला चढवला. मुख्यमंत्री बंगले लपवतात तर त्यांचे मंत्री बायको लपवते असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला.धनंजय मुंडे यांच्यावर थेट बलात्काराचा आरोप झाल्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री  धनंजय मुंडे यांनी बलात्काराच्या आरोपानंतर फेसबुकवर पोस्ट करुन, आरोप करणारी रेणू शर्मा ही करुणा शर्माची बहीण असल्याचं म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे “करुणा शर्मा यांच्याशी आपला सहमतीने संबंध होता, त्यांच्यापासून आपल्याला दोन अपत्ये आहेत, त्यांचं पालनपोषण आपणच करत असून, आपल्या कुटुंबाला सर्व माहिती आहे” आपल्याला ब ब्लॅकमेल कारण्याचा हेतू असून हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असंही मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

धनंजय मुंडे यांच्या फेसबुक पोस्टमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. विरोधकांच्या होती आयते कोलीत मिळाले असून या विपयावरून मुख्यमंत्र्यांसह सत्ताधिकाऱ्यांना भाजपने टार्गेट केलं आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचं दर्शन एव्हाना महाराष्ट्राला झालं आहे. कोरोना काळात त्यांनी दाखवलेला संयम आणि राज्याला दिलेला दिलासा सर्वांनी पाहिला आहे. नैतिक आणि कायदेशीरदृष्ट्या मुख्यमंत्र्यांवर दबाव असू शकतो , सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळख असलेले मुख्यमंत्री आता धनंजय मुंडेंवर काय अॅक्शन घेणार ? हे 1 पाहणं महत्त्वाचं आहे.

शरद पवारांची भूमिका काय ?

एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं असताना, दुसरीकडे धनंजय मुंडे यांचे पक्षाध्यक्ष शरद पवार काय प्रतिक्रिया देतात हे ही पाहणं महत्त्वाचं आहे. शरद पवार यांचा शब्द हा फक्त राष्ट्रवादीतच नव्हे तर आता महाविकास आघाडीतही प्रमाण मानला जातो. जर शरद पवारांनी कडक भूमिका घेतली तर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद मुख्यमंत्रीही वाचवू शकणार नाहीत. धनंजय मुंडेंना पायउतार होऊन येईल त्या प्रसंगाला तोंड द्यावं लागेल, जर निर्णय झालाच, तर चौकशीलाही सामारो जावं लागेल.

.. तेव्हा पवारांनीच  विचारला होता मुंडेना जाब? 

ज्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापनेच्या हालाचाली सुरु होत्या, त्यावेळी अभूतपूर्व चित्र पाहायला मिळालं होतं. सत्तेचं समीकरण जुळलं असताना अजित पवारांनी अचानक देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन पहाटेच शपथविधी उरकला होता. त्यावेळी अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे काही आमदार दिसले होते. मात्र पहाटेच्या शपथेनंतर राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता दिवसभर गायब होता, तो नेता म्हणजे धनंजय मुंडे. त्यावेळी धनंजय मुंडे यांना शरद पवारांनी खासगीत जाब विचारल्याचं राजकीय जाणकारांनी सांगितलं होतं. धनंजय मुंडे त्यावेळी पक्षादेश झुगारुन अजित पवारांसोबत गेल्याने, शरद पवार संतापल्याचं चित्र होतं. दरम्यान या प्रकरणावर शरद पवार यांची नेमकी भूमिका काय राहील, याची उत्सूकता राज्याच्या राजकीय  , सामाजिक वर्तुळात ताणली गेली आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या