Ticker

6/Breaking/ticker-posts

घुले बंधूच्या पाठपुरव्याला यश ; घोरपडे कुटुंबाला मिळाली 12 लाखांची मदत

 

बोधेगाव:- शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील मयत कृष्णा बाळासाहेब घोरपडे सह मुलगा प्रथमेश कृष्णा घोरपडे तर मुलगी वैष्णवी कृष्णा घोरपडे यांचे दि.२३ जुलै २०२० रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास बीड जिल्ह्यातील पौळाची वाडी येथील अमृता नदीच्या पुलावरून दुचाकीवर जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने  दुचाकीसह तिघेही पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या या दुर्घटनेत घोरपडे कुटुंबातील तिघेही बाप लेकरं पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मयत झाले होते. या घटनेने घोरपडे कुटूंबावर तसेच बालमटाकळी सह परिसरावर दुखाचा डोंगर कोसळला होता. या कुटुंबाला आधार तसेच आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शेवगाव-पाथर्डीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धंनजय मुंढे यांच्याकडे तात्काळ पाठपुरावा केला.त्यामुळे घोरपडे कुटुंबाला 12 लाखाची मदत मिळाली आहे.


     या घटनेने घोरपडे कुटूंबावर तसेच बालमटाकळी सह परिसरावर दुखाचा डोंगर कोसळला होता. या कुटुंबाला आधार तसेच आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शेवगाव-पाथर्डीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धंनजय मुंढे यांच्याकडे तात्काळ पाठपुरावा केला असून लवकरच आर्थिक मदत मिळवून देण्यात येईल असे आश्वासन मुंढे यांच्याकडून देण्यात आले होते त्यानुसार आज दि. १२ जानेवारी रोजी मंगळवारी बीड जिल्ह्यातील गेवराई येथील तहसील कार्यालय या ठिकाणी घोरपडे कुटुंबाला मंजूर झालेला शासन निर्णय १३ मे २०१५ अंतर्गत नसर्गिक आपत्ती विभागाकडून १२ लाख रुपयांचा धनादेश गेवराईचे नायब तहसीलदार रामदासी शामसुंदर तसेच अव्वल कारकून ऐन.एम. खेडकर यांच्या हस्ते घोरपडे कुटुंबातील मयताची पत्नी राधा घोरपडे, तसेच कुटुंबातील सदस्य बाळासाहेब घोरपडे, सामाजिक कार्यकते सर्जेराव घोरपडे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला असून याकामी शेवगाव-पाथर्डीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बालमटाकळी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन प्रशांत देशमुख, वेंकटेश मल्टीस्टेटचे उपाध्यक्ष व्यंकटराव देशमुख, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संचालक छगनराव राजपुरे, संदीप शिंदे , बाळासाहेब ढाकणे, शेखर बामदळे, पांडुरंग सपकाळ यांच्यासह आदींचे विशेष आणि मोलाचे सहकार्य लाभले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या