Ticker

6/Breaking/ticker-posts

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर खा.विखे यांची केंद्रीय कृषिमंत्र्यांशी चर्चा

 


अहमदनगर :- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विविध प्रश्नांसंदर्भात खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेऊन चर्चा केली. 

  गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय कृषी कायद्यांबद्दल विविध प्रकारचे गैरसमज पसरवले जात असून शेतकऱ्यांच्या व्यापक हिताच्या दृष्टीने बाजार समित्यांच्या अस्तित्वा बरोबरच शेतमालाला  योग्य भाव मिळण्याची व्यवस्था असली पाहिजे . शेतीमालाच्या मूल्यवर्धन वाढीसाठी विविध प्रकारच्या योजनां शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना परिसरातील कृषी विद्यापीठांचा, कृषी विज्ञान केंद्र मधल्या संशोधनाचा लाभ मिळाला पाहिजे, यासाठी   लवकरच कृषी मंत्रालयाकडून पाऊले उचलली जातील त्या दृष्टीने लवकरच संबंधित  विभागाकडून त्याची अंमलबजावणी केली जाईल असे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी सांगितले आहे अपेक्षा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

  खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी यापूर्वी पिक विमा मिळावा यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील खरीप हंगामातील थकीत पिक विमा मिळावा यासाठी थेट कृषिमंत्र्यांना साकडे घातले होते. त्यांनी त्याबाबत सूचना दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले.   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी काम करीत आहे, असे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी सांगितले  शेतकर्यांच्या वतीने विखे पाटील यांनी कृषिमंत्री तोमर यांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या