Ticker

6/Breaking/ticker-posts

शहरातील सर्वच फलकांचा महापालिकेने आढावा घ्यावा

 

भाजपचे ज्येष्ठ नेते अ. अभय आगरकर यांची मागणी

 अहमदनगर- केवळ नेहरू पुतळ्याजवळीच नव्हे, तर संपूर्ण शहरात लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांचा आढावा घेऊन परवानगीविना लावलेले फलक काढण्यात यावेत अथवा त्यांच्याकडून कर वसूल करावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते अॅड. अभय आगरकर यांनी केली आहे.

नेहरू पुतळ्यासोर लावलेले होर्डिंग्ज काढण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने मध्यंतरी आंदोलन केले. या आंदोलनानंतर तेथील काही होर्डिग्ज काढण्यात आले. ॅड. आगरकर यांनी या पार्श्वभूमीवर ही मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की शहरात ठिकठिकाणी जाहिरात, वाढदिवसाच्या शुभेच्छा याचे फलक लागलेले आहेत. हे फलक लावण्यासाठी महापालिकेची अधिकृत परवानगी आहे का? नसेल तर या फलकांवर कारवाई का होत नाही? जाहिराती किंवा शुभेच्छांचे फलक याबाबत न्यायालयाने मध्यंतरी आदेश दिलेले आहेत. शहराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. विना परवानगी फलक लावलेले असल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचेही आदेश दिलेले आहेत.

न्यायालायच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब महापालिकेकडून होताना दिसत नाही. तसेच आतापर्यंत किती जणांवर गुन्हे दाखल केले, हे देखील महापालिकेने स्पष्ट केले पाहिजे. न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वाप्राणे फलक लावण्यात आलेले असतील तर त्याचा कर महापालिकेला मिळतो का, हे देखील पाहिले पाहिजे. असे फलक महापालिकेचे मोठे उत्पन्नाचे साधन आहेत. अगोदरच आर्थिक संकटात असल्याचे एकीकडे महापालिका सांगत असताना दुसरीकडे मात्र अशा उत्पन्नाकडे जाणवपूर्वक दुर्लक्ष करते. एरवी रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणार्यांवर कारवाईचा बडगा उगारणारी महापालिका जाहिरात व शुभेच्छांच्या फलकाबाबत मात्र मिठाची गुळणी घेत आहे. महापालिकेने आंदोलन झाले म्हणून फक्त नेहरू पुतळ्यासोरील होर्डिंग्ज काढण्यावर थांबू नये, तर शहरातील सर्वच फलकांचा आढावा घ्यावा, अशी मागणी अॅड. आगरकर यांनी केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या