Ticker

6/Breaking/ticker-posts

कोरोना लस : राज्यातील माथाडी कामगार यांचा पहिल्याटप्प्यात समावेश करण्यात यावा

                                                                 नगर

देशात येत्या 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिम सुरु करण्यात येणार आहेसुरुवातीस आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांना ही लस मोफत दिली जाणार आहेया बरोबरच राज्यातील सर्व माथाडी कामगारकष्टकरीहमाल माथाडी यांना सुद्धा यावेळेस मोफत लसीकरण करण्यात यावेअशी मागणी राज्य हमाल मापाडी संघटनेचे सहचिटणीस अविनाश घुले यांनी केली आहे.

     याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरेउपमुख्यमंत्री ना.अजित पवारआरोग्यमंत्री ना.राजेश टोपेकामगार मंत्री ना.दिलीप वळसे पा., जिल्हाधिकारीमनपा आयुक्त यांना पाठवून ही मागणी केली आहेअत्यावश्यक सेवेमध्ये ज्याप्रमाणे डॉक्टर्ससिस्टरमनपा कर्मचारीपोलिस यांचा सहभाग होतोत्याचबरोबर यांच्या बरोबरीने राज्यातील माथाडी कामगार आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेतहमाल मापाडी सर्व माथाडी कामगार यांचा सुरुवातीच्या काळात अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश करण्यात आला आहेयापूर्वीही कोरोना काळात माथाडी बोर्डाच्यावतीने हमाल-माथाडी कामगारांना चार हजार रुपयांचे अनुदानही यावेळी प्राप्त झाले होतेअशा कष्टकरी वर्गाला पहिल्या टप्प्यात लसीकरण मोफत केले पाहिजेअशी मागणी घुले यांनी केली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या