Ticker

6/Breaking/ticker-posts

सोनईतील हरवलेले फरांदे बाबा सोशलमिडीयामुळे सापडले..!

 

सोनई:- घरात न सांगता देवदर्शनासाठी गेलेले फरांदे बाबा वीस दिवसापासून हारवले होते.कुटुंब व नातेवाईक त्यांना शोधत होते.मात्र नाशिक येथून त्यांचे नाव व छायाचित्र सोशलमिडीयावर टाकण्यात आले आणि काही तासातच त्यांची व परीवाराची अपुर्व भेट घडून आली आहे. 

  सोनई येथील भगवान म्हस्कू फरांदे(वय-८०)हे मागील महिन्यात हारवले होते.कुटुंब व नातेवाईकांनी त्यांना सर्वत्र शोधले.मात्र कुठेच त्यांचा तपास लागला नव्हता. संपुर्ण कुटूंब चिंतेत होते. नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते  अविनाश सुर्यवंशी यांनी फरांदे यांची विचारपुस केली.त्यांना घरातील कुणाचाच मोबाईल नंबर पाठ नव्हता.सुर्यवंशी यांनी त्यांचे नाव,गाव व छायाचित्र सोशलमिडीयावर टाकले.आणि तपासाला गती आली.

नगर येथील शिरीष सोनवणे यांनी ही पोस्ट सर्वत्र फिरवली.नंतर हा संदेश विनायक दरंदले यांच्या आम्ही सोनईकर'सह नेवासे तालुक्यात फिरला 'सोनईकर'चे ग्रुप सदस्य व स्टाईल टेलर्सचे संचालक अशोक शिरसाठ यांनी त्यांना ओळखत मुलगा हेमंत फरांदे यांना सर्व माहिती दिली.हे ऐकून सर्व फरांदे परीवाराचा जीव भांड्यात पडला.काल सायंकाळी मुलगा,सून व नातेवाईक भगवान फरांदे यांना आणण्यासाठी नाशिकला रवाना झाले.आयटीआय सिग्नल,सातपुर नाशिक येथून त्यांना आज सुखरूप घरी आणण्यात आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या