Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगावात आढळला मुंडके नसलेला महिलेचा व कवटी फुटलेला युवकाचा मृतदेह..

 शेवगाव : -शेवगाव शहरात मुंडके नसलेला एका साठ वर्षीय महिलेचा तर कवटी फुटलेला एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असुन या हत्येने शेवगाव तालुका  हादरला  आहे.

      शहरात पाथर्डी रोडवर आयटीआय शेजारी नविन ईदगा मैदानात रविवारी दुपारी दोन अनोळखी मृतदेह आढळून आले. यात मुंडके नसलेला व कोपरापासुन डावा हात नसलेल्या एका साठ वर्षाच्या वृद्ध महिलेचे धड तर डोक्याची कवटी फुटलेला एका  चौदा वर्षाच्या मुलाचा मृतदेह होता. दुपारच्या सुमारास पोलीसांना याची माहिती मिळाल्यानंतर  स.पो.नि.सुजीत ठाकरे, विश्वास पाबरा, पो.कॉ. रवि शेळके, सुधाकर दराडे, अच्युत चव्हाण, अनमोल चन्ने, दिलीप राठोड हे घटनास्थळी दाखल झाले. तेथे महिलेला मुंडके नसल्याचा मृतदेह निदर्शनास आला त्या मुंडक्याचा पोलीस शोध घेत असताना  साधारण  ७५ फुटावर झुडपात मुलाचा मृतदेह पोलीसांना दिसुन आला. त्याच्या अंगावर निळ्या रगांची जिन्स पॅन्ट व निळसर रगांचा शर्ट होता.
          मयत व्यक्ती भटक्या समाजाच्या असावा  ईदगा मैदानावर ते उघडया मैदानात होते. तेथे असलेल्या एका पत्र्याच्या पेटीत पिवळ्या धातुचे मोठी घुंगरे व घंटा होत्या, त्यांचे संसारपयोगी वस्तु अस्ताव्यस्त पडल्या होत्या. तसेच घटनास्थळी मृत महिलेचे केस पडलेले होते. दुपारी साडेचार वाजता श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले, मात्र रक्षा नावाचे श्वान जागेवरच घुटमळल्याने माग निघु शकला नाही. घटना स्थळावर वाहनाच्या टायर खुना होत्या तेथेच श्वान थांबले गेल्याने हत्या करु आरोपी वाहनातुन पसार झाल्याचा संशय आहे.
या घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या