Ticker

6/Breaking/ticker-posts

श्रेया बुगडेसमवेत मिमिक्री, रॅम्प वॉक, नृत्य आणि उखाण्यांची धमाल !

 


पारनेर : - 'चला हवा येउ द्या' फेम श्रेया बुगडे हीला पाहण्यासाठी पारनेर शहरातील महिलांनी किसान इंटरनॅशनल स्कुलच्या प्रांगणात शनिवारी सायंकाळी तोबा गर्दी केली होती. किसान परिवाराने आयोजित केलेल्या हळदी कुंकू सोहळयात श्रेया बुगडेसोबत मिमिक्री, रॅम्प वॉक, नृत्य तसेच उखाण्यांची धमाल करीत शहरातील महिलांनी संक्रांतीचा वाण लुटला. सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास श्रेया बुगडे हीचे व्यासपिठावर आगमन होताच मोठया जल्लोषात महिलांनी तिचे स्वागत केले. 

 उपस्थित महिलांपैकी काळी साडी परीधार केलेल्या महिलांना श्रेया हिने व्यासपिठावर आमंत्रीत करून त्यांच्यासमवेत सादर केलेल्या मिमिक्रीने धमाल उडवून दिली. सहभागी महिलांनीही त्याचा मनमुराद आनंद लुटला. जेन्टस् रूमाल जवळ असलेल्या महिलांना श्रेया बुगडे हिने आमंत्रीत केले. त्यांच्यासमवेत श्रेया कशाचे सादरीकरण करणार याची उत्सुकता होती. त्या महिलांना रॅम्प वॉक करण्यास भाग पाडून श्रेयाने कार्यक्रमाचा आनंद अधिकच व्दिगुणीत केला. कुणाच्या पर्समध्ये त्यांच्या 'आहों' चा फोटो आहे याची विचारणा केल्यावर अनेक महिलांनी त्यांच्या 'आहों'चा फोटो व्यासपिठावर येत श्रेयास दाखविला. त्यांच्यासमवेतही श्रेयाने प्रश्‍नोतरे केली.

उपस्थित महिलांसाठी ठेवण्यात आलेल्या ड्रॉप बॉक्समधून भाग्यवान महिलांना चांदीच्या वस्तू भेट देण्यात आल्या. कार्यक्रमास हजेरी लावलेल्या प्रत्येक महिलेचे हळदी कुंकू लावून स्वागत करण्यात आले. त्यांना संक्रांतीच्या वाणाची भेट देण्यात येउन अल्पोपहारही देण्यात आला. कार्यक्रमास सुरूवात झाल्यापासून समारोपापर्यंत महिलांचा उत्साह प्रत्येक क्षणाक्षणाला वाढत गेला. उपस्थित महिलांच्या आग्रहाखातर श्रेयानेही उखाणा घेतला, त्यास उपस्थित महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. 

'किसान' चे अध्यक्ष चंद्रकांत चेडे, उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, उपनगराध्यक्ष दत्तात्रेय कुलट, पाणीपुरवठा समितीच्या सभापती सुरेखा भालेकर, जेष्ठ पत्रकार संजय वाघमारे, शिवाजी शिर्केचंद्रकांत कावरे, बापू शिंदे, शिवाजी जाधव, शिवाजी चेडे, विजय वाघमारे, उदय शेरकर, कुणाल पोटे, रामदास वाळूंज, सखाराम बुगे, अर्जुन व्यवहारे, संपत औटी, सागर वैद्य, मनसेचे शहर अध्यक्ष वसिम राजे, कैलास औटी, संजय आढाव, अप्पा सोबले, राजेंद्र ठुबे, माजी नगराध्यक्षा सीमा  औटी, मालन शिंदे, कल्पना शिंदे, उमाताई बोरूडे, संगिता वसंत चेडे, अशा चेडे, धनश्री पोटे, प्रतिभा औटी, निलम वैदय, उषा व्यवहारे, सुनिता कावरे, जयश्री कानडे, सविता ठुबे, आरती जाधव, पुष्पा बुगे, सुरेखा देशमाने आदी यावेळी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या