Ticker

6/Breaking/ticker-posts

नगर बीड रोड वर कड्याजवळ वऱ्हाडाची ट्रॅव्हल्स पलटली

 

0
78
ट्रॅव्हल्स


20 जण गंभीर जखमी
आष्टी:- नगर बीड महामार्गावर कडा येथील कर्डिले वस्ती जवळ आज सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वऱ्हाडाचा ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात वीस जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली

या बाबत अधिक माहिती अशी की, कल्याण येथून जामखेड तालुक्यातील पिंपळगाव येथे लग्नासाठी बावधन ट्रॅव्हल्स क्र . ( MHO5 Dk 6125 )मधून वल्हाड येत होत .सोमवारी दुपारचा लग्नाचा कार्यक्रम उरकुन परत कल्याणकडे जाताना रात्री आठ वाजता ट्रॅव्हल्स रस्त्यावर पलटी झाली. या ट्रॅव्हल्सचे चारही चाके पूर्णपणे वरती झाल्याने हा राष्ट्रीय महामार्ग सुमारे दोन तासापासून बंद आहे .  आष्टीपासून नगर कडे जाणारी पूर्ण वाहतूक यामुळे बंद आहे. जखमींना सरपंच तात्या ढोबळे ,संपत सांगळे,बंटी गायकवाड, गणेश चोरडिया, संभाजी ढोबळे पत्रकार रघुनाथ कर्डीले, जयेश कदम व ग्रामस्थांनी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले.जखमींवर कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. जखमी मध्ये लहान मुले व महिलांचा समावेश आहे.

जखमीची नावे अशी : -विंघ्नेस श्रावण बनसोडे .महेर श्रवण बनसोडे .श्रवण बनसोडे,कवू भगवान कांबळे,चंची श्रावण बनसोडे .

शशिकांत जाधव
विलास डाडर
राजाबाई डाडर
सुनील पवार
सुनीता जाधव
अजय जाधव
धोंडबाई जाधव
बाळू कसबे
विराज जाधव
पवन जाधव
कालिंद जाधव
अनिकेत जाधव
कनिराम राठोड चालक
सुनील पवार

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या