Ticker

6/Breaking/ticker-posts

राहूरी : गणेगावात . विजयी मिरवणूकीबर लाठीहल्ला ...


ज्याच्या अंगावर गुलाल दिसेल त्याला बेदम चोपले
 

राहुरी : तालुक्यातील गणेगांव येथे विजयी मिरवणुकीत जेसीबी वरून गुलालाची मुक्त उधळण करीत विजयाचा जल्लोष साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यावर दंगल नियंत्रण पथकानेे jतुफान लाठीमार केला असून ज्याच्या अंगावर गुलाल दिसेल त्याला घराघरात घूसून चोप दिल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे .

याबाबत ह्रकिगत अशी की , ग्राम पंचायत निवडणूकीत यावेळी भाजपाने सर्वच्या सर्व जागी विंजय मिळविला . त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना आकाश ठेंगणे झाले . याचा आनंदोत्सव साजरा करत असताना पौलिस तेथे आले . त्यांनी मिरवणूक थांबावण्याची विनंती केली परंतु कार्यकर्ते ऐकण्याच्या मन : स्थितीत नव्हते . ही बाब वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे कानावर घातली गेली .  सूत्रे वेगाने ह्वालली काहि वेळातच दंगल नियंत्रणे  पथकाची गाडी तेथे आली . गुलाल दिसेल त्याच्यावर लाठ्या पडू लागल्या तरुण सै रावैरा वाट दिसेल तिकडे पळू लागले तरी पोलिस पिच्छा सोडिनात अक्षरशः घराघरात घुसून मारहान केली . विजयी मिरवणूकीवर हा 'प्राजक्तां'च्या  फुलांचा सडा पडल्याने विजयी उन्मादात बेधुंद युवकांच्या पाठीवर गुलाबाची लाली चढली गेली .त्यामुळे या प्रकाराची तालुक्यात खुमासदार चर्चा रंगली आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या