Ticker

6/Breaking/ticker-posts

नगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाबाबत खा. विखे यांनी काय केल्या महत्वाच्या सूचना..

नगर :- नगरशहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामासाठी भूसंपादनाचा प्रश्न जवळ पास मार्गी लागला. शहराच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा  उड्डाणपुलाची सक्कर चौक ते स्टेट बँक चौका पर्यंत खा. डॉ.सुजय विखे पाटील यांनी आज (दि.18) पाहणी करुन  हे काम सुरळीत व्हावे त्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत अशा सूचना संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या .

यावेळी डॉ सुजय विखे पाटील. यांचेसह  महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक योगीराज गाडे ,मा.नगरसेवक निखिल वारे, प्रशांत दारकुंडे, महानगरपालिका उपायुक्त डॉ प्रदीप पठारे,पाणी पुरवठा अभियंता सातपुते, महानगरपालिकेचे मेहत्रे, शहर अभियंता ईथापे, पाणी पुरवठा विभाग रोहकले व राहुल गीते,महावितरण चे सह्ययक अभियंता उल्ले,सार्वजनिक बांधकाम विभागाचे गायकवाड,अतिक्रमण विभागाचे रिजवान शेख,राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दिगविजय पाटणकर, श्रीकांत लोखंडे, मुनिर सय्यद,वाहतूक पोलिस निरीक्षक देवरे,उड्डाणपूलाचे ठेकेदार शेळके,वीज वितरणचे ठेकेदार  खेडकर, नगर रचना कार्यालयाचे अधिकारी वैभव जोशी ,व शहरातील नागरिक उपस्थित होते.

 नगर शहरातील उड्डाणपुलाच्या संदर्भातील 99 टक्के जागा  हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केले गेली असून पथदिवे व इतर विद्युतीकरणाच्या स्थलांतराची तसेच भूसंपादन झालेल्या जागेचे लवकरात लवकर अतिक्रमण काढून जल वाहीनी स्थलांतराचे काम पूर्ण करण्याचे सूचना केल्या. या उड्डाणपुलाच्या कामात येणारे अतिक्रण, पथदिवे, विद्युतीकरणाचे खांब तसेच जलवाहीणीच्या स्थलांतर काम पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी दिले, नगर शहराच्या विकासाकामांमध्ये राजकरण न करता सर्व पक्षीय सहकार्यने शहराचे विविध विकासकामे पूर्ण करु अशी ग्वाही त्यांनी दिली . 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या