Ticker

6/Breaking/ticker-posts

उद्यानाच्या शुशोभीकरणावरुन पाथर्डीत श्रेयवाद रंगला..

 

   पाथर्डी :-                                                             माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड  माजी नगरसेवक  डॉ.दीपक  देशमुख  हे दोघेही एकमेकांविरोधात  उद्यानाच्या शुशोभीकरणावरुन उभे ठाकले आहे.पाथर्डी शहराच्या फुले  नगर विभागात असलेले  भगवान उद्यान विकसित करण्याच्या मुद्यावरून सध्या पालिका अंतर्गत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
    माजी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या विकासनिधीतून फुलेनगर येथे पालिकेच्या मालकीचा असलेल्या भूखंडावर उद्यान उभारण्यात आले आहे.यासाठी तत्कालीन नगरसेवक डॉ. दीपक देशमुख यांनी पुढाकार घेत या उद्यानाचा विकास केला.सध्या अभय आव्हाड प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांनी या उद्यानाचे सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न केला असता त्याला डॉ. दीपक देशमुख यांच्यासह या प्रभागातील नागरिक अशोक व्यवहारे,किरण पालवे, विठ्ठल दहिफळे, अविनाश फुंदे यांनी विरोध दर्शवत पालिकेचे  मुख्याधिकारी यांच्याकडे लेखीस्वरूपात तक्रार दाखल केली.  तक्रारीत म्हंटले आहे कि, एका खाजगी प्रतिष्ठानने या भगवान उद्यानाचा ताबा घेत येथील उद्यानाचा शासकीय नामफलक पुसून टाकला आहे,उद्यानातील रंगवलेल्या भिंती पुसून टाकल्या आहेत, उद्यानात प्रतिष्ठानच्या जाहिराती असलेल्या वस्तू आणून ठेवलेल्या असून ही सर्व कामे काही प्राध्यापक व्यक्तींनी केली असून त्यांच्यावर कारवाई करावी चालू असलेले काम बंद करावे अशी मागणी तक्रार अर्जात केल्या नंतर पालिकेने  प्रतिष्ठान मार्फत सुरु असलेले हे काम तातडीने बंद केले. 

          त्या नंतर अभय आव्हाड प्रतिष्ठान ने सुद्धा नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे यांना एक पत्र दिले असून त्या मध्ये म्हंटले आहे कि या उद्यानाची चावी एका खाजगी व्यक्तीकडे असल्याने उद्यानात वृद्ध लहान मुलांना जाता येत नाही. या उद्यानाची चावी पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे देण्यात यावी. या उद्यानाच्या सुशोभीकरणास आम्हास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पत्राच्या शेवटी करण्यात आली असून या पत्रावर नगरसेवक प्रसाद आव्हाड, नगरसेविका दुर्गा भगत, अमित बोरसे, संजय बडे आदींच्या सह्या आहेत. याच विषयावर डॉ. देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. 

     दरम्यान ज्या प्रभागात हे उद्यान आहे त्या प्रभागातून आगामी पालिका निवडणूक लढवण्यासाठी अभय आव्हाड डॉ. दीपक देशमुख हे तयारीला लागले असून सध्या या प्रभागाचे नेतृत्व अभय आव्हाड यांचे पुतणे प्रसाद आव्हाड हे करत आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी डॉ.दीपक देशमुख यांच्या बंधूंचा पराभव केला होता. अभय आव्हाड डॉ देशमुख यांना मानणारा मोठा वर्ग शहरात असून या दोघांमध्येच आता शीतयुद्धाला सुरवात झाल्याने पालिका वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला आहे. विषय फक्त उद्यानाच्या शुशोभीकरणाचा आहे. परंतु यात राजकीय वादाला सुरुवात झाली आहे.  

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या