Ticker

6/Breaking/ticker-posts

राळेगणसिद्धीत साडया वाटणा-या दोघांना रंगेहात पकडले

 

भरारी पथकाची कारवाई :  ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

 पारनेर :-शुक्रवारी होणा-या ग्रामपंचायत निवडणूकीच्या पावर्श्‍वभुमिवर राळेगणसिद्धीत दोन जणांना  मतदारांना साडया वाटताना भरारी पथकाने गुरूवारी सायंकाळी रंगेहात पकडले. दोघांनाही तहसिलदार ज्योती देवरे यांच्यापुढे हजर करण्यात आल्यानंतर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे तहसिलदार ज्योती देवरे यांनी सांगितले.

  राळेगणसिद्धीची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्यानंतर पारंपारीक विरोधक असलेले जयसिंग मापारी तसेच लाभेश औटी यांनी हेवेदावे दुर ठेउन बिनविरोध निवड करण्यासाठी नउ उमेदवारांची नावे निश्‍चित केली. आमदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला होता. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत राळेगणसिद्धीत झालेल्या बैठकीत बिनविरोध निवडणूकीच्या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तबही झाले. त्यानंतर काही तरूणांनी राजकीय गटांनी परस्पर निर्णय  घेतल्याचे तसेच त्यांना विश्‍वासात न घेतल्याची भुमिका घेतली. हजारे यांच्याकडे त्यांनी तशी तक्रार केल्यानंतर लोकशाही पद्धतीने तुम्हीही निवडणूक लढवू शकता असे हजारे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर शाम बाबा पॅनलच्या नावाने तरूणांनी निवडणूकीच्या रिंगणात पॅनल उतरविला. मात्र  दोन जागांवर त्यांना उमेदवार देता आले नाही. त्यामुळे बिनविरोध निवडणूक करण्यासाठी निश्‍चित करण्यात आलेल्या दोन्ही गटांच्या पॅनलचे दोन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडणूक आले आहेत.

  ग्रामपंचायतीचा प्रचार शांततेत पार पडल्यानंतर शुक्रवारी होणा-या मतदानाच्या पार्श्‍वभुमिवर गुरूवारी सायंकाळी मतदारांना साडया वाटताना दोन जणांना  भरारी पथकाचे अधिकारी तथा गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब बुगे यांनी रंगेहात  पकडले. दोघासोबत दोन महिलाही होत्या. पथकात महिला कर्मचारी नसल्याने महिलांना ताब्यात घेण्यात आले नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या