Ticker

6/Breaking/ticker-posts

सौरउर्जा प्रकल्‍पाला मिळाली चालना





लोकनेता न्यूज ऑनलाईन :

.डॉ. सुजय विखे पा. व महापौर बाबासाहेब वाकळे यांचे उपस्थितीत सौरउर्जा प्रकल्‍पा बाबत आढावा बैठक

 नगर :्.खा.डॉ.श्री.सुजयविखे पा. यांनी अहमदनगर महानगरपालिकेमध्‍ये सौर उर्जा प्रकल्‍पाबाबत आढावा बैठक घेतली. घेऊन  तो कार्यान्वित करण्यासाठी पावले उचलण्याच्या सूचना केल्या . यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर सौ.मालनताई ढोणे , स्‍थायी समितीचे सभापती मrनोज कोतकर, उपायुक्‍त प्रदीप पठारे, श्री.सिनारे, श्री.‍लांडगे, श्री.राऊत, नगरसेवक मा.श्री.कुमार वाकळे, मा.श्री.स्‍वप्निल शिंदे, शहर अभियंता श्री.इथापे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख श्री.आर.जी.सातपुते, विद्युत विभाग प्रमुख श्री.मेहेत्रे, अभियंता श्री.गाडळकर, श्री.रोहोकले, श्री.जोशी, श्री.निंबाळकर, माजी नगरसेवक



.श्री.धनंजय जाधव, श्री.निखील वारे, .श्री.बाळासाहेब पवार, श्री.विलास ताठे, संसय ढोणे, मेडाचे अधिकारी व एमएसईबीचे अधिकारी आदी उपस्थित होते.

 यावेळी खा.डॉ.श्री.सुजय विखे पा. यांनी सांगितले की, मा.शासनाकडून सौरउर्जा प्रकल्‍पासाठी 28 कोटी 50 लाख रूपये मंजूर झाले आहेत. परंतु मागील वर्षी कोरोनाची परिस्थिती उदभवल्‍यामुळे सदर प्रकल्‍पाला गती मिळाली नाही. त्‍यासाठी बैठक आयोजीत केली आहे.  मनपा पाणी पुरवठयापोटी एमएसईबीला अंदाजे 1 कोटी ते सव्‍वा कोटी पर्यत दरमहा बील भरते. सदर प्रकल्‍पामुळे मनपाचे मोठया प्रमाणात रक्‍कम वाचणार आहे. मेडाने 6 कोटी 50 लाख रूपयाचा प्रस्‍ताव तयार केला आहे. उर्वरित रक्‍कम रूपये 21 कोटी 50 लक्ष रूपयाचा प्रस्‍ताव तयार करण्‍याच्‍या सुचना.खा.डॉ.श्री.सुजय विखे यांनी दिल्‍या. त्‍यासाठी .शासनाकडून मंजूरी आणू असे सांगितले. याबाबत उर्जामंत्री यांचेसमवेत देखील बैठक घेवून मनपाकडे असलेली थकबाकी माफ करण्‍यासाठी तसेच सदर प्रस्‍तावास मंजूरीकामी प्रयत्‍न करण्‍यात येईल. सदरचे सौर उर्जा प्रकल्‍प मुळा डॅम , विळद, नागापूर, वसंत टेकडी, केडगांव, आगरकर मळा, नालेगांव, डॉन बास्‍को, बुरूडगांव रोड, बोल्‍हेगांव  येथे बसविण्‍यात येणार आहे. 

यावेळी मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले की, सदर प्रकल्‍पाला 17 डिसेंबर 2018 रोजी मा.शासनाकडून मंजूरी मिळाली. त्‍यासाठी 28 कोटी 50 लक्ष रूपये प्राप्‍त झाले. सदर योजनेचे काम लवकरात झाल्‍यास मनपाचे पाणी पुरवठयापोटी येणारे वीज बील कमी होण्‍यास मदत होईल यादृष्टिने सौरउर्जा प्रकल्‍पाबाबत लवकरात लवकर कार्यान्‍वीत होणे आवश्‍यक आहे. मनपास विद्युत बीलापोटी मोठी रक्‍कम भरावी लागते त्‍यामुळे नागरिकांना नागरी सुविधा देण्‍यास अडचणी येतात. कोरोना या साथीच्‍या आजारामुळे वर्षभर या कामाची कार्यवाहीस विलंब झाला. आज रोजीच्‍या बैठकीत दिलेल्‍या सुचनानुसार कार्यवाहीस गती देवून लवकरात लवकर प्रकल्‍पाचे काम सुरू करण्‍याचे दृष्टिने कार्यवाही करण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी यावेळी दिल्‍या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या