जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. शुक्रवारी माजी राज्य मंत्री
शिवाजी कर्डिले यांनी १०९ पैकी १०० पेक्षा जास्त मतदारांसह सर्थकांसमवेत
शक्तीपदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. बाजार समितीतील संपर्क कार्यालय येथून
जिल्हा बँकपर्यंत शक्तीप्रदर्शन केले.
उमेदवारी
अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवाजी कर्डिले म्हणाले, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत
नगर तालुययातील १०९ सोसायटी पैकी १०० ठराव आपल्याकडे असल्यामुळे बँकेच्या
निवडणुकीत आपला विजय पक्का आहे. केलेल्या विकासकामांची पावती म्हणून दहा
वर्षापासून बिनविरोध निवडून येत आहे. जिल्हा बँकेत संचालक झाल्यापासून शेतकरी
हिताचेच निर्णय घेतले आहेत. शेतकर्यांना गायी, म्हशी
घेण्यासाठी तर महिलांना लघुउद्याग चालू करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून अर्थ
सहाय्य केले आहे. महाआघाडीकडे फक्त नऊच सोसायटया शिलक राहिल्या आहेत तरी सुध्दा
कर्डिले यांना बिनविरोध निवडून येवू द्यायचे नाही म्हणून ते विरोधाला विरोध केल्याशिवाय
राहणार नाहीत, असा हल्लाबोल केला. शेतक -या ना दहा लाख
रुपयावसन पंचवीस लाख रुपये घर बांधणी साठी कर्ज उपलब्ध करुन दिले आहे तसेच
शेतकऱ्याच्या मुलांना व्यवसायासाठी कर्ज सुविधा उपलब्ध केली असल्याचे कर्डीले
यांनी यावेळी सांगीतले. नगर तालुका हा दुष्काळी तालुका आहे या भागातील शेतक या ना
मदत करण्याचे काम केले . शेतकऱ्याना संकटातून बाहेर काढले . सध्या झालेल्या ५९
ग्रामपंचायती च्या निवडणुकीत ४५ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहे .
0 टिप्पण्या