Ticker

6/Breaking/ticker-posts

पाथर्डी तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व- अँड. प्रतापराव ढाकणे

 

टाकळीमानूर :-पाथर्डी तालुक्यातील ७५ ग्रामपंचायत निवडणूकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल ३० ग्रामपंचायतीवर वर्चस्व सिध्द झाले.शिवसेना चार ग्रामपंचायतींमध्ये विजयी झाली आहे.बिनविरोध झालेल्या तीन ग्रामपंचायतपैकी दोन ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला.एकूण ७८ ग्रामपंचायतपैकी महाविकास आघाडीच्या ताब्यात ३६ ग्रामपंचायतींचा कारभार विविध गावातील ग्रामस्थांनी सोपविल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीवरील जनतेचा विश्वास यानिमित्ताने अधोरेखित झाला असल्याची माहिती केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अँड. प्रतापराव ढाकणे यांनी दिली.

 
    तालुक्यातील ७८ ग्रामपंचायती पैकी तीन ग्रामपंचायत बिनविरोध पार पडल्या होत्या.त्यातील सोमठाणे खुर्द व खेर्डे या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आले.तर ७५ ग्रामपंचायतीच्या निवडणूक मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात ३०,शिवसेना ४ अश्या ग्रामपंचायती आल्या आहेत. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने अतिशय चुरशीने या निवडणूका लढविल्या.स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संयमी व लक्ष्यवेधी प्रचार करून जनतेच्या मनात स्थान प्राप्त केले.राज्यातील महाविकास आघाडी सरकारची शेतकरी हिताची धोरणे तालुक्यातील जनतेला पटल्याने त्यांनी अनेक गावांमध्ये सत्तांतर घडवून आणले गेले एक वर्ष आपण सर्वच अतिशय वेगळ्या परिस्थितीतून वाटचाल करीत आहोत मात्र अशाही स्थितीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने जनतेच्या हितासाठी कुठलीही कसर ठेवली नाही. विशेषतः शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून त्यांना मोठा आधार देण्याचे मुख्य धोरण राबविले.तसेच रोजगाराचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याची सुरूवात येत्या काही दिवसांत होणार आहे.

            तालुक्यातील भाजप नेतृत्वाने मागील सव्वा वर्षांपासून तालुक्यातील विकासाच्या बाबतीत कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने लोकांचा रोष आजच्या निकालावरून स्पष्ट झाला आहे. यापुढे तालुक्यातील प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाईल.ज्या गावांनी पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आधाडीवर विश्वास टाकला त्यांचा विश्वास अधिक वृध्दिंगत करण्यासाठी प्रयत्न स्थानिक पातळीवर विजयी झालेले लोकप्रतिनिधी करतील तालुक्यातील आडगाव, भिलवडे, भोसे, चितळवाडी, चिंचपूर इजदे,ढाकणवाडी, घाटशिरस,घुमटवाडी, जाटदेवळे,जवळवाडी,जोगेवाडी,कोरेगाव,केळवंडी,खरवंडीकासार,खेडे,माळीबाभूळगाव,मुंगूसवाडे,मोहोज बु.मोहोज खुर्द, ,मोहोटे,मालेवाडी,नांदूर निंबादैत्य,   निपाणीजळगाव,पारेवाडी,पिंपळगावटप्पा, पिरेवाडी,राघोहिवरे, रांजणी,शिराळ,शेकटे,तोंडोळी खु. व वाळंज  प्रमुख गावांसह इतर ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेने सत्ता खेचून आणली असल्याचे अंड प्रतापराव ढाकणे यांनी म्हट्ले  आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या