Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा बँक निवडणूक : नागवडे-जगतापांची एकी, पानसरेंची भुमीका काय ?

 







काष्टी :- श्रीगोंदा तालुक्यात एकमेकांच्या  विरोधात असणारे नागवडे कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे व माजी आमदार राहुल जगताप हे जिल्हा बॕकेच्या निवडणूकीसाठी एकत्र आल्याने पुन्हा जिल्हा बॕकेत संचालक  होण्याचे स्वप्न पहाणारे दत्ता पानसरे यांची मोठी अडचण झाल्याने ते निवडणूकीतून माघार घेणार की लढणार याचीच तालुक्यात खमंग चर्चा चालु आहे.

             जिल्हा  बॕकेची निवडणूक सुरू झाल्यामुळे तालुक्यात अनेक मातंबर नेत्यांना बॕकेत संचालक होण्याचे डोहाळे लागलेत . त्यासाठी अनेकांनी आपली वरीष्ठ नेत्यांच्या मार्फत फिल्डीग लावल्याचे समजते. कारण भाजपने पक्षीय पॅनल करून निवडणूक लढविण्याचे जाहिर केले असल्यामुळे  राज्यातील आघाडी सरकार असल्यामुळे तीच आघाडी बॕकेच्या निवडणूकीत रहाणार हे मात्र सत्य आहे. त्यामुळे जिल्हा  बॕकेच्या निवडणूकीत महसुल मंत्री बाळासाहेब थोरात व माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील असे दोन पॕनल होतील .यामध्ये जिल्हा  बॕकेत पुन्हा  संचालक होण्यासाठी दत्ता पानसरे यांनी गेली सहा महिन्यापासून तालुक्यात बॕके मार्फत मोठमोठे कार्यक्रम घेऊन तयारी चालविली होती. नुकताच त्यांचा वाढदिवस झाला त्यात त्यांनी  शक्ती प्रदर्शन सुद्धा  केले. कार्यक्रमाला आमदार बबनराव पाचपुते नागवडे कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते,   बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नहाटा, पंचायत समिती सदस्य  अण्णासाहेब शेलार यांच्यासह   सर्व पक्षीय नेते एकत्र बोलविले होते. पण प्रत्यक्ष बॕकेची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर माजी आमदार राहुल जगताप उमेदवारी करणार म्हटल्यावर त्यांना नागवडे कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी साथ देण्याची भूमिका घेतली. या दोन दिग्गजांना एकत्र यावे लागले यातच पानसरेंचे तगडे आव्हान अधोरेखित झाले आहे .

      मा.आ.राहुल जगताप यांनी आपला थोरात गटाकडून बाबासाहेब भोस,घनश्याम शेलार, आण्णासाहेब शेलार, यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत   उमेदवारी अर्ज भरला हेच जगताप-नागवडे एकत्र आल्याने पानसरे यांची मोठी अडचण झाली कारण बॕकेसाठी तालुक्यात सहकारी सेवा संस्थेतून एकूण १७१ मतदान आहे.यामध्ये  जगताप यांनी ११५ मतदारांना आपल्या बाजुने घेतल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून समजते. बाकी राहिलेल्या मतदानात पानसरे यांचा सेवा संस्थेतून निभाव लागेल का यामुळे पानसरे याची मोठी कोंडी झाली आपली डाळ शिजणार नाही.  त्यामुळे कदाचित दत्ता  पानसरे सारखा समोर तगडा उमेदवार नसल्याने  माजी आमदार राहुल जगताप बिनविरोध होवू शकतात.

            जगताप यांच्या विरोधात नको म्हणून पानसरे हे स्वतः किंवा पत्नी अर्चना पानसरे यांना भाजपाकडून इतर ठिकाणी उमेदवारी मिळते का याच प्रयत्नात ते आहेत असे समजते. तर दुसरीकडे कडे भाजपाच्या जिल्ह्यातील सर्व नेत्यांची बैठक झाल्याने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडविस यांनी आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, मा.आमदार राम शिंदे, मा.आमदार शिवाजीराव कर्डीले वैभव पिचड, यांच्यासह इतर भाजपा नेत्यांना  जिल्हा बॕक हि पूर्ण ताकदीने एकत्र येवून पूर्ण  ताकतीने लढवा असा आदेश दिल्याने श्रीगोंदा  तालुक्यातुन विखे यांच्या परवानगीने व आमदार बबनराव पाचपुते यांच्या आदेशाने सहकारातील जेष्ठ नेते भगवानराव पाचपुते यांनी आदेशाचे पालन करीत विद्यमान संचालक दत्ता पानसरे, अनिल दांगट,प्रकाश उंडे, अशोक दांगट, यांच्या उपस्थितीत मान्यवरांसह     उमेदवारी अर्ज भरला आहे. तर आघाडी कडून ओबीसी  मधून आपल्याला  बॕकेत संधी मिळावी म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्फत अजित पवार यांच्याकडे  उमेदवारी साठी आण्णासाहेब शेलार यांनी फिल्डीग लावली असल्याचे समजते तसे शेलार आता जगताप यांच्या  बरोबर दिसत आहे. काॕग्रेसकडून अनुराधा राजेंद्र नागवडे,व भाजपा कडून प्रविण सोपानराव कुरुमकर हे उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे समजते.त्यामुळे आता खरी लढत कोणाची कोणा बरोबर होणार यांची चर्चा चालु आसताना मात्र जगताप नागवडे यांच्या एकीने पानसरेंची आता काय भूमिका राहील , ते माघार घेणार  की रिंगणात उतरणार याचीच तालुक्यात चर्चा रंगु लागलीय हे मात्र नक्की !

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या